धाराशिव : दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या मंदिरात मोठ्या उत्साहात बैलपोळा सण साजरा करण्यात आला. तुळजाभवानी मातेच्या मंदीरातील मठाचे बैल कमानवेस येथील मारूती मंदीरापासून वाजत-गाजत मंदिरात आणण्यात आले. बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य देऊन तुळजाभवानी मंदीरात मुख्य गाभाऱ्यासमोर बैलांची पुजा करण्यात आली.

तुळजापूर शहरत बैलपोळा सण पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. डुल्या मारुती मंदिरात देवीचे महंत तुकोजीबुवा व चिलोजीबुवा तसेच भोपेपुजारी पाटील यांचे मानाचे बैल आल्यावर त्यांना सजविण्यात आले. पूजन झाल्यानंतर वाजत- गाजत बैलांना तुळजाभवानी मंदिरात आणण्यात आले. मंदिरात बैलांचे पारंपारिक पद्धतीने तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात नेऊन पूजन करण्यात आले.

maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Vivah muhurat 2025 Marriage Dates in 2025 Hindu Panchang
Vivah Muhurat 2025 : नवीन वर्ष २०२५ मध्ये विवाहासाठी किती शुभ मुहूर्त, पाहा जानेवारी ते डिसेंबरपर्यंतच्या तारखांची यादी
Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून
washim assembly constituency dispute within mahayuti
महायुतीमध्ये असंतोषाची दरी, बंडखोरीमुळे वाशीम जिल्ह्यात वाद वाढले; कारवाईत पक्षपातीपणा?
Shani gochar in kumbh shash rajyog 2024
२०२५ पर्यंत ‘या’ राशींचे लोक होतील मालामाल; शनीच्या शश राजयोगामुळे कमावतील चिक्कार पैसा अन् जगतील राजासारखे जीवन
father Thomas d souza
वसई धर्मप्रांताच्या बिशपपदी फादर थॉमस डिसोजा, व्हॅटीकन सिटीच्या पोपकडून घोषणा
thane district senior citizen home voting
ठाणे जिल्ह्यात गृहमतदानाला सुरुवात

आणखी वाचा-प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी आमदार भास्कर जाधव यांना कुडाळ न्यायालयात जामीन

बैलांना देवीचे दर्शन घालून झाल्यानंतर महंत व पुजारी बांधवांनी बैलाचे पूजन केले. त्यानंतर बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला. वाजत गाजत बैल मठाकडे रवाना झाले. यावेळी महंत तुकोजीबुवा, महंत महंत हमरोजीबुवा, व्यवस्थापक तहसीलदार माया माने, धार्मिक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले, मंदिर कर्मचारी गणेश गायकवाड, दोन्ही मठाचे सेवक, पुजारी, सेवेकरी प्रथमेश औटी, भाविक व कर्मचारी उपस्थित होते. शहरात देखील शेतकऱ्यांनी आपली बैल मारुती मंदिरात आणून त्याचे पूजन करून त्यांना नैवेद्य दाखवू शहरात त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढत पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात पोळा सन साजरा केला.