Bajrang Sonawane : बीडच्या जनतेचा शासनावर आता विश्वास उरलेला नाही असं खासदार बजरंग सोनावणेंनी म्हटलं आहे. आवादा कंपनीने मस्साजोगला काम बंद केलं नाही. ६ डिसेंबर या दिवशी आरोपींनी मस्साजोगचं जे आवादा कंपनीचं ऑफिस आहे तिथे अधिकाऱ्यांवर हल्ला केला. तिथल्या वॉचमनलाही मारलं गेलं. संतोष देशमुख सरपंच होते. त्यांना या घटनेबाबत सांगण्यात आलं. सरपंच संतोष देशमुख यांनी गावातील व्यक्तीला मदत करण्यासाठी गेले. त्यावेळी त्यांनाही मारहाण करण्यात आली. लोक मधे पडले, त्यांनी वाद सोडवला. सोनवणे नावाचा जो गार्ड होता त्याने जातीवाचक शिवीगाळ केली म्हणून पोलिसात तक्रार करायले गेला. त्याला चार तास बसवून ठेवलं आणि थातुरमातुर तक्रार दाखल केली. सदर आरोपींना ९ तारखेला अटक दाखवून जामीन मंजूर केला. यासाठी ६ डिसेंबरला कुणाचा फोन आला होता? हे तपासणं गरजेचं आहे असं बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी म्हटलं आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा