दुर्लक्षित अशा शेवगा पिकाचे भरघोस उत्पन्न घेऊन बाळासाहेब मराळे यांनी त्याचे व्यापारी महत्त्व सिद्ध केले आहे.  स्वत: त्यात यश मिळवून राज्यातील शेतकऱ्यांमध्ये त्याचा प्रचार आणि प्रसार केला. मराळे यांचे हे कार्य दीपस्तंभासारखे इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देणारे आहे, असे गौरवोद्गार जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी काढले. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे हरित क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित कार्यक्रमात वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने दिले जाणारे कृषीगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. सिन्नर तालुक्यातील शहा येथील शेवगा उत्पादक व शेवग्याचा रोहित-१ वाण विकसित करणारे संशोधक शेतकरी बाळासाहेब मराळे यांनाही पुरस्कार देण्यात आला. यावेळी तटकरे यांनी मराळे यांनी शेवगा पिकासाठी केलेल्या कार्याचा गौरव केला.  कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, राज्य कापूस पणन महासंघाचे अध्यक्ष डॉ. एन. पी. हिराणी, राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री मनोहर नाईक, माजी खासदार सदाशिव ठाकरे आदी उपस्थित होते.  पुरस्कार प्रदान समारंभानंतर मराळे यांनी ‘शेवगा एक कल्पवृक्ष या विषयावर व्याख्यान दिले.

Ajit pawar maratha leader rising in Delhi
Ajit Pawar: अजित पवार दिल्लीतील नवे मराठा स्ट्राँगमॅन; खासदार सुनेत्रा पवार यांना शरद पवारांसमोरील बंगला मिळाल्यामुळे चर्चांना उधाण
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Local fishermen save life of couple stuck in rough sea in ratnagiri
दाम्पत्याला भाट्ये समुद्रात खेळणे पडले महागात; स्थानिक मच्छीमारांनी वाचविले प्राण
murder of Satish Wagh, Satish Wagh, dispute,
सतीश वाघ यांची हत्या जुन्या वादातून, पाच लाखांची दिली होती सुपारी – पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार
Sugarcane Cultivation Kolhapur , Sugarcane ,
लोकशिवार… मुरमाड जमिनीतील उसाची दमदार लागवड
Nagpur Guardian Minister, Devendra Fadnavis,
नागपूरच्या पालकमंत्रीपदावरून तर्कवितर्क
Manyachiwadi Gram Panchayat received Nanaji Deshmukh Best Gram Panchayat and Gram Urja Swaraj Award
वैशिष्ठ्यपूर्ण मान्याचीवाडी ठरले देशातील सर्वोत्तम ग्राम, राष्ट्रपतींच्या हस्ते बुधवारी प्रतिष्ठेच्या दोन पुरस्कारांसह अडीच कोटींच्या बक्षिसांचे वितरण
Ner Taluka, groom marriage, groom Ner bullock cart ,
यवतमाळ : शेतकरी नवरदेवाने घोड्यावरून नव्हे तर बैलबंडीवरून काढली लग्नाची वरात, स्वत: धुरकरी बनलेल्या युवकाचे पंचक्रोशीत कौतुक
Story img Loader