दुर्लक्षित अशा शेवगा पिकाचे भरघोस उत्पन्न घेऊन बाळासाहेब मराळे यांनी त्याचे व्यापारी महत्त्व सिद्ध केले आहे. स्वत: त्यात यश मिळवून राज्यातील शेतकऱ्यांमध्ये त्याचा प्रचार आणि प्रसार केला. मराळे यांचे हे कार्य दीपस्तंभासारखे इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देणारे आहे, असे गौरवोद्गार जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांनी काढले. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे हरित क्रांतीचे जनक माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित कार्यक्रमात वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने दिले जाणारे कृषीगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. सिन्नर तालुक्यातील शहा येथील शेवगा उत्पादक व शेवग्याचा रोहित-१ वाण विकसित करणारे संशोधक शेतकरी बाळासाहेब मराळे यांनाही पुरस्कार देण्यात आला. यावेळी तटकरे यांनी मराळे यांनी शेवगा पिकासाठी केलेल्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, राज्य कापूस पणन महासंघाचे अध्यक्ष डॉ. एन. पी. हिराणी, राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री मनोहर नाईक, माजी खासदार सदाशिव ठाकरे आदी उपस्थित होते. पुरस्कार प्रदान समारंभानंतर मराळे यांनी ‘शेवगा एक कल्पवृक्ष या विषयावर व्याख्यान दिले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा