हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृती दिन. १७ नोव्हेंबर २०१२ हा दिवस महाराष्ट्र कधीही विसरू शकत नाही. कारण याच दिवशी महाराष्ट्राचे लाडके नेते बाळासाहेब ठाकरे यांनी जगाचा निरोप घेतला. त्यानंतर प्रत्येक वर्षी या दिवशी त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला जातो. तसंच बाळासाहेब ठाकरे हे एखाद्या वलयाप्रमाणे आजही महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचं स्थान राखून आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करतानाच बाळासाहेबांच्या विचारांवर जातो आहोत असं म्हटलं. तर उद्धव ठाकरेंनी माझा वारसा मला बाळासाहेबांनीच दिला आहे असं म्हटलं. बाळासाहेब ठाकरे हे नाव महाराष्ट्रात कधीही विसरलं जाणार नाही. आज त्यांच्या स्मृतीदिनी माजी पर्यावरण मंत्री आणि बाळासाहेब ठाकरेंचे नातू आदित्य ठाकरे यांनी खास पोस्ट लिहित आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय आहे आदित्य ठाकरेंची पोस्ट?

आजोबा आणि नातू हे नातं जगात सगळ्यात ‘स्पेशल’ असतं…
त्यात आदर असतोच,
पण मैत्री जास्त असते…
धाक असतोच,
पण प्रेम जास्त असतं…
वयाचं अंतर असतंच,
पण मन जवळ असतं….
आजोबा हा नातवाचा पहिला मित्र असतो… त्यापेक्षा घट्ट मित्र दुसरा कोणीही असू शकत नाही!

मी भाग्यवान आहे की, जगासाठी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे’ असलेला युगपुरूष माझा ‘आज्या’ आहे … बाळासाहेबांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन!

आदित्य ठाकरे यांनी या शब्दांमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी शेवटच्या दसरा मेळाव्यात उपस्थिती लावली नव्हती. प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी एक व्हिडीओ संदेश दसरा मेळाव्यात पाठवला होता. त्या व्हिडीओत बाळासाहेब ठाकरेंची प्रकृती पाहून सगळ्या महाराष्ट्राच्या काळजाचा ठोका चुकला होता. व्हिडीओतल्या त्या छोट्याश्या संदेशात माझ्या उद्धव आणि आदित्यतला सांभाळा असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते. आज बाळासाहेब ठाकरेंचा स्मृती दिन आहे. त्या निमित्ताने आदित्य ठाकरेंनी आजोबा बाळासाहेब ठाकरेंविषयी केलेली भावनिक पोस्ट चर्चेत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balasaheb thackeray death anniversary aditya thackeray emotional post on social media scj