केंद्रीय निवडणूक आयोगानं ठाकरे गटाकडून सादर करण्यात आलेली अडीच लाख प्रतिज्ञापत्रं बाद केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, ठाकरे गट अथवा शिंदे गटाच्या वकिलांनी अद्याप याची पुष्टी केली नाही. हे वृत्त समोर आल्यानंतर ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्षचिन्ह कुणाला मिळणार? याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत. दरम्यान, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू निहार ठाकरे यांनी मोठं विधान केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘धनुष्यबाण’ हे चिन्ह बाळासाहेबांची शिवसेना अर्थात शिंदे गटाला मिळेलं, असं त्यांनी म्हटलं आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते. ठाकरे आणि शिंदे गटातील सत्तासंघर्षावर भाष्य करताना निहार ठाकरे म्हणाले की, निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून सादर करण्यात आलेली अडीच ते तीन लाख प्रतिज्ञापत्रे रद्द केली आहेत. संबंधित प्रतिज्ञापत्रं निवडणूक आयोगानं ठरवलेल्या फॉरमॅटनुसार नव्हती, असं कारण आयोगानं दिल्याचं समजत आहे. या कारणामुळेच ते प्रतिज्ञापत्रं रद्द केली आहेत. याचा ठाकरे गटाला कुठे ना कुठे फटका बसू शकतो.

हेही वाचा- ठाकरे गटाची अडीच लाख प्रतिज्ञापत्रं बाद? फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्ट शब्दांत म्हणाले “स्वत:च्या समाधानासाठी…”

असं असलं तरी, शेवटी बहुमत कुणाकडे आहे? हे दोन्ही गटांना सिद्ध करावं लागणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या बाजुने बहुसंख्य खासदार आणि आमदार आहेत, हे आपल्याला माहीत आहे. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की, वेळ आल्यावर आम्ही नक्की बहुमत सिद्ध करू… कारण बहुमत आमच्याच बाजुने आहे. निवडणूक आयोगही आमच्याच बाजुने निर्णय देईल, अशी मला अपेक्षा आहे. तसेच शिवसेनेचं मूळ चिन्ह ‘धनुष्यबाण’ हे ‘बाळासाहेबांची शिवसेना’ अर्थातच शिंदे गटाला मिळेल, अशी प्रतिक्रिया निहार ठाकरे यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balasaheb thackerays grandson nihar thackeray on dhanushyaban bow and arrow will get shinde group rmm