पहाटेचा शपथविधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच झाला होता, असे खळबळजनक विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. फडणवीसांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. शरद पवार यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस हे सुसंस्कृत ग्रहस्थ आहेत, ते असत्याचा आधार घेतील, असे मला वाटले नव्हते, अशी प्रतिक्रिया शरद पवार म्हणाले आहेत. यावरच आता काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पहाटेचा शपथविधी शरद पवार यांना विचारून झालेला नव्हता असे माझे मत आहे, असे थोरात म्हणाले आहेत. ते आज (१५ फेब्रुवारी) माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
हेही वाचा >>> आशिष शेलार यांचे आदित्य ठाकरेंना खुले आव्हान; म्हणाले, “त्यांनी कोल्हेकुई…”
पहाटेचा शपथविधी शरद पवार यांना….
“एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणेज ते शरद पवार आहेत. पहाटेचा शपथविधी शरद पवार यांना विचारून झाला असता तर ते सरकार पडलेच नसते. पहाटेचा शपथविधी शरद पवार यांना विचारून झालेला नाही, या मताचा मी आहे,” असे बाळासाहेब थोरात स्पष्टपणे म्हणाले.
हेही वाचा >>> लोकसभेसाठी भाजपा तिकीट देणार का? रक्षा खडसे म्हणाल्या, “पक्षाने दुसऱ्यांना तिकीट…”
भाजपाकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न
“काहीतरी वाद निर्माण करण्याचे काम केले जात आहे. त्यांच्याकडे बोलण्यासाठी दुसरे काहीही नाही. विकासाच्या मुद्द्याकडे लक्ष केंद्रीत करण्याऐवजी वेगळे वाद निर्माण करायचे, हे भाजपाच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. भाजपाकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असा आरोप थोरात यांनी केला.
हेही वाचा >>> सत्यजीत तांबे भाजपात प्रवेश करणार? ‘त्या’ ट्वीटवर दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…
… ते म्हणाले शरद पवार आपल्याबरोबर आहेत
दरम्यान,फडणवीसांच्या विधानावर भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पहाटेचा शपथविधी शरद पवार यांच्या समंतीनेच झाला होता, असा दावा मुनगंटीवार यांनी केला. “शरद पवारांनी अनुमती दिली, असं देवेंद्र फडणवीस सांगतात, तेव्हा माझ्यासारख्यांना विश्वास बसतो. देवेंद्र फडणवीसांनी पहाटेच्या शपथविधीबद्दल भाष्य केलं, तेव्हा पहिल्यांदा २३ नोव्हेंबर २०१९ चा दिवस आठवला. कारण, शपथविधीच्या दिवशी मी चंद्रपूरला होतो. शपथविधी झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांना फोन केला होता. शरद पवार आपल्याबरोबर आहेत. दोन दिवसांनी सर्व व्यवस्थित होईल, असे फडणवीस मला म्हणाले होते. पण, नंतर घडलेल्या घटनेनंतर मलाही आश्चर्य वाटलं,” असे मुनगंटीवार म्हणाले.