काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे काल सायंकाळी संगमनेर येथे आगमन झाले. बाळासाहेब थोरात हे सत्यजीत तांबे यांच्यासह संगमनेरमध्ये आले असताना कार्यकर्त्यांनी जल्लोषात त्यांचे स्वागत केले. यावेळी संपन्न झालेल्या जाहीर सभेत थोरात यांनी चौफेर टोलेबाजी केली. नाशिक पदवीधर निवडणूक, त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांशी झालेला संघर्ष, राजीनामा नाट्य या सर्व विषयांवर थोरात यांनी भाष्य केले. तसेच आपला भाचा सत्यजित तांबेबद्दलही ते मन मोकळं करुन बोलले. यावेळी त्यांनी केलेल्या एका सूचक वक्तव्यामुळे सत्यजीत हे काँग्रेसमध्ये पुनरागमन करणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

हे वाचा >> “शरद पवारांनी ते कांड केलं असतं तर…” पहाटेचा शपथविधी आणि फडणवीसांच्या दाव्यावर संजय राऊत यांचं मोठं विधान

Ajit Pawar And Amol Mitkari.
Ajit Pawar : “…तर सरकारलाही अर्थ नाही”, अजित पवार आणि अर्थ खात्यावरून अमोल मिटकरींचा महायुतीलाच टोला
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Image of Vice-President Jagdeep Dhankhar or Rajya Sabha proceedings
No Confidence Motion : भारताच्या संसदीय इतिहासातील सर्वात मोठी घटना, राज्यसभा सभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव
Amit Deshmukh On Nana Patole
Amit Deshmukh : विधानसभेतील अपयशानंतर महाराष्ट्रातील काँग्रेस नेतृत्वात बदल होणार? ‘या’ नेत्याने स्पष्ट सांगितलं
What Devendra Fadnavis Said About Rahul Narwekar ?
Devendra Fadnavis : “राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही पुन्हा आले..”, देवेंद्र फडणवीस यांचं खुमासदार भाषण
Nagpur evm machines marathi news
ईव्हीएमविरुद्ध शंखनाद…मतपत्रिकेवर मतदान घेण्यासाठी नागपुरात…
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही गेले? शरद पवारांनी सांगितलं मोठं कारण; म्हणाले, “…म्हणून मी आलो नाही”
raj thackeray cm devendra fadnavis
Raj Thackeray: …म्हणून राज ठाकरे विधानसभेला महायुतीत सहभागी झाले नाहीत, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण; म्हणाले, “आमच्याकडे त्यांना…”!

माझा हात नीट असता तर..

“भारत जोडो यात्रा महाराष्ट्रा आली असताना सत्यजीतने त्यात खूप काम केले. सत्यजीतची टीम राहिली काँग्रेसमध्ये आणि तू एकटा राहिला. आता तुलाही करमणार नाही, त्यांनाही करमणार नाही आणि काँग्रेसलाही करमणार नाही. माझा हात नीट असता तर तांत्रिक चूकही झाली नसती. मी स्वतः नाशिकमध्ये राहिलो असतो, ती चूक होऊ दिली नसती. परंतू या सगळ्यामधून माझ्या मताची दिल्लीने दखल घेतली आहे. काहीही झाले तरी पक्षांतर्गत गोष्टी आम्ही पक्षातच सोडवू.”, असं वक्तव्य थोरात यांनी जाहीर सभेत केलं.

अपक्ष किती दिवस टिकतं ते पाहू

थोरात म्हणाले की, डॉ. सुधीर तांबे यांनी पाच जिल्ह्यांचा पदवीधर मतदारसंघ व्यवस्थित बांधला आणि सांभाळला. देशात कुठेही नसेल एवढा जनसंपर्क या पाच जिल्ह्यात तांबे यांचा आहे. मी नेहमी त्यांना म्हणतो की, मला तमुची गाडी आणि ड्रायव्हरचे कौतुक वाटते. सुधीर तांबे यांनी पाचही जिल्ह्यात जिव्हाळ्याचे नाते तयार केले, हे नाते सत्यजीत तू विसरू नको, असा सल्ला थोरात यांनी सत्यजीत तांबे यांना दिला. त्यांची मेहनत आणि कष्टामुळेच तुला मतदान झाले आहे. तुझx अपक्ष आता किती दिवस टिकते ते पाहू. कारण आमच्याशिवाय काही जमणार नाही आणि तुलाही करमणार नाही. डॉ. सुधीर तांबे यांचे काम आणखी पुढे कसे नेता येईल, अशी अपेक्षा मी सत्यजीतकडून करत आहे.

संगमनेर तालुक्याचे सुसंस्कृत राजकारण

“संगमनेर तालुक्याच्या राजकारणात बंधूभावाची एक संस्कृती आहे. दहशतीची किंवा कुणाचं वाईट करुन त्याचे वाईट करण्याची आपली परंपरा नाही. संगमनेर तालुक्यात राजकारण करत असताना आपण कुणाचं वाईट करण्याचा प्रयत्न केला, असं एकही उदाहरण तुम्हाला दिसणार नाही. आपल्याला आतापर्यंत भरभरून मतदान लोकांनी केले, पुढच्या काळात देखील लोक करतील.”, अशी भावना थोरात यांनी व्यक्त केली.

Story img Loader