Jayashree Thorat On Sujay Vikhe Patil: विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलच तापलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली असून ठिकठिकाणी अनेक नेत्यांनी सभा आणि मेळाव्यांच्या माध्यमातून निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी मतदान पार पडणार आहे, तर २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागणार आहे. आता निवडणुकीसाठी थोडे दिवस शिल्लक राहिल्यामुळे अनेक दिग्गज नेत्यांनी आपलं वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी कंबर कसली आहे. यातच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. आता या पार्श्वभूमीवर संगमनेर विधानसभा मतदारसंघातही राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे.

भाजपाचे माजी खासदार सुजय विखे यांनी एका मेळाव्यात बोलताना काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. ‘राज्याचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना आता आमदार होणंही अवघड झालं आहे, त्यामुळे मुख्यमंत्री सोडा, आता ते आमदार तरी राहतात का?’, असा सवाल करत सुजय विखे यांनी बाळासाहेब थोरातांवर खोचक टीका केली होती. त्यानंतर आता बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांनी सुजय विखेंना इशारा देत हल्लाबोल केला आहे. “खबरदार! माझ्या बापाविषयी बोलाल तर”, असं जयश्री थोरात यांनी म्हटलं आहे. युवक काँग्रेसच्या पदाधिकारी मेळाव्यात जयश्री थोरात बोलत होत्या.

BJP leader Vasantrao Deshmukh on Jayashree Thorat
Jayashree Thorat: “माझी लाडकी बहीण म्हणायचं आणि लेकीवर भर सभेत..”, भाजपा नेत्याच्या अश्लाघ्य विधानानंतर विरोधकांचा संताप
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Sharad Pawar Workers Angry over Anushakti nagar
Anushakti Nagar : “आमच्यापैकी कोणाची बायको हिरॉइन नाही म्हणून आम्हाला टाळलं असावं”, शरद पवारांचे कार्यकर्ते आक्रमक; मुंबईत बंडखोरी होणार?
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
What Devendra Fadnavis Said?
Devendra Fadnavis : गरज पडल्यास कुणाचा पाठिंबा घेणार? शरद पवार की उद्धव ठाकरे? फडणवीस म्हणाले, “आम्ही फक्त..”
Ajit Pawar
Ajit Pawar : अजित पवार युगेंद्र पवारांबद्दल बोलताना भावूक, डोळ्यांच्या कडा ओल्या, आवंढा गिळला अन् म्हणाले…
NCP Sharad Pawar Third Candidate List
NCP Sharad Pawar Third Candidate List : मोठी बातमी! शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंच्या विरोधात दिला ‘हा’ तगडा उमेदवार
Maharashtra Assembly Election 2024 Live Updates in Marathi
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर काँग्रेसमध्ये दोन गट? शाहू महाराज – सतेज पाटील यांच्यातील संबंधात कटुता?

हेही वाचा : मविआचं अखेर ठरलं! जागावाटपाबाबत नाना पटोलेंनी जाहीर केला मुहूर्त; म्हणाले, “आम्ही तिघं…”

जयश्री थोरात काय म्हणाल्या?

“संगमनेर तालुक्याकडे वाकड्या डोळ्यांनी पाहायचं नाही. तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय हा संगमनेर तालुका राहणार नाही. बाळासाहेब थोरात हे संगमनेर तालुक्याचा स्वाभीमान आहेत. खबरदार! माझ्या बापाविषयी तुम्ही काही बोलले तर. ज्यांना स्वत:चं घर सांभाळता येत नाही, ते आपलं घर काय सांभाळणार”, असा इशारा जयश्री थोरात यांनी माजी खासदार सुजय विखे यांना दिला आहे.

“तुमचं महायुतीचं सरकार जेव्हापासून आलं, तेव्हापासून त्रास चालू झाला. मात्र, बाळासाहेब थोरात यांनी त्यांचं काही वाईट केलं नव्हतं. बाळासाहेब थोरात हे सर्वात जास्त काळ महसूलमंत्री राहिले आहेत. पण त्यांनी कधी कोणाचं वाटोळं केलं नाही. कोणालाही त्रास दिला नाही”, असं म्हणत जयश्री थोरात यांनी नाव न घेता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीका केली.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत पराभव झालेले भाजपाचे माजी खासदार सुजय विखे यांनी काही दिवसांपूर्वी संगमनेर विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे संगमनेरमधून महायुतीचा उमेदवार कोण असणार? याकडे अनेकांचं लक्ष लागलेलं आहे. दुसरीकडे बाळासाहेब थोरात विरुद्ध राधाकृष्ण विखे पाटील यांच्यामध्ये कायम आरोप-प्रत्यारोप सुरु असतात. मात्र, आता बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांनी देखील सुजय विखे यांना सुनावल्यामुळे राजकारण तापण्याची शक्यता आहे.