संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय राहिलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजीत तांबे यांनी विजय मिळवला. या निवडणुकीपूर्वी काँग्रेसने तांबे पिता-पुत्रांवर कारवाई करत त्यांना पक्षातून निलंबित केले होते. त्यानंतर सत्यजीत तांबेंनी ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. दरम्यान, या प्रकरणावर आता बाळासाहेब थोरात यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. संगमनेरमध्ये आयोजित एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे नागरिकांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा – ‘काँग्रेस की भाजपाला पाठिंबा देणार?’, सत्यजीत तांबेंनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “मी…”

काय म्हणाले बाळासाहेब थोरात?

विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी मोठं राजकारण झालं. सत्यजीत या निवडणूक चांगल्या मतांनी विजयी झाले. मी त्यांचं अभिनंदन करतो. मात्र, जे राजकारण झालं, ते व्यस्थित करणारं होतं. मी याबाबत माझी भूमिका पक्षश्रेष्ठींकडे मांडली आहे. हे पक्षीय राजकारण आहे. त्यामुळे यावर बाहेर बोललं पाहिजे, या मताचा मी नाही. याबाबत पक्षातील नेत्यांबाबत बोलणं झालं असून योग्य तो निर्णय होईल, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली. तसेच गेल्या काही दिवसांत काही लोकांना आपल्याबद्दल गैरसमज पसवण्याचं काम केलं. मात्र, काँग्रेसचा विचार हा आपला विचार आहे आणि आपली पुढेची वाटचालही याच विचाराने होणार आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – “राष्ट्रहिताकरिता साहित्यिकांनी प्रखरपणे विचार मांडावे”, साहित्य संमेलनात नितीन गडकरींनी व्यक्त केलं मत; म्हणाले, “देशाची लोकशाही…”

महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर मोठ्या प्रमाणात राजकारण होतं आहे. अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना त्रास दिला जात आहे, त्यांना अडचणी आणलं जात आहे, त्यांचे उद्योग बंद पाडण्यासाठी अनेकांकडून प्रयत्न सुरू आहे. मात्र, आपण अनेकदा संघर्ष केला आहे. संघर्षातूनच आपण मोठं झालो आहे. त्यामुळे या संघर्षातून आपण नक्कीच बाहेर येऊ, असा मला विश्वास आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – कसबा पेठ, चिंचवड पोटनिवडणुकीबाबत वंचित आघाडीची भूमिका काय? प्रकाश आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, “आम्ही…”

दरम्यान, नागपूर अधिवेशनावेळी मी सकाळी फिरायला गेलो होतो. यावेळी चालताना माझा तोल गेला आणि मी पडलो. त्यामुळे खांद्याला दुखापत झाली. ब्रीच कॅंडी या रुग्णायात माझ्यावर उपचार झाले. डॉक्टरांनी मला एक महिना प्रवास करण्यास मनाई केली म्हणून मी कार्यक्रमाला येऊ शकलो नाही, अशी महितीही त्यांनी दिली.

Story img Loader