Balasaheb Thorat : महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक अवघ्या १५-१६ दिवसांवर येऊन ठेपली आहे. २० तारखेला मतदान प्रक्रिया पार पडेल तर २३ नोव्हेंबर हा निकालाचा दिवस आहे. या महिन्याच्या शेवटापर्यंत सरकार कुणाचं? मुख्यमंत्री कोण? हे जवळपास निश्चित झालेलं असणार आहे. ४ नोव्हेंबरचा दिवस म्हणजे अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. ज्या ठिकाणी नाराजांनी अपक्ष म्हणून अर्ज भरले आणि ज्या ठिकाणी बंडखोरी झाली होती त्या ठिकाणी बहुतांश उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोहोंमधील बंडखोर किंवा अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत. बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी महाविकास आघाडीबाबत समाधान व्यक्त केलं आहे. तसंच महाविकास आघाडी किती जागा जिंकेल याचंही उत्तर दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बाळासाहेब थोरात नंदुरबार दौऱ्यावर, सुहास नाईक यांची बंडखोरी मागे

काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तळोदा मतदार संघात काँग्रेसचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास नाईक यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या बंडखोरीला रोखण्यासाठी पक्ष श्रेष्ठींकडून प्रयत्न करण्यात येत होते. आज काँग्रेसचे गटनेते बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी बैठक घेत सुहास नाईक यांच्या घरी जात त्यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर लगेचच सुहास नाईक यांनी आपला उमेदवारी अर्ज माघार घेण्याची घोषणा केली. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार राजेंद्र गावित यांना मोठा फायदा होणार आहे.

हे पण वाचा- अहमदनगर : संगमनेरमधून माजी मंत्री आमदार थोरात यांच्या विरोधात शिवसेनेचे अमोल खताळ

बाळासाहेब थोरात महायुतीबाबत काय म्हणाले?

महायुतीचं सरकार हे संविधानाची पायमल्ली करुन आलेलं सरकार आहे. हे सरकार महाराष्ट्रातून घालवणं हे आमचं उद्दीष्ट आहे. आम्ही त्याच अनुषंगाने तयारीला लागलो आहोत. पक्षांतर बंदीचा कायदा मोडीत काढून हे सरकार आलं आहे. असं बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) म्हणाले. यानंतर महाविकास आघाडीच्या किती जागा येतील असं विचारलं असता, आमच्या १८० जागा आल्या तरीही आश्चर्य वाटून घेऊ नका असं म्हणत १८० किंवा त्याहून जास्त जागा येतील असा विश्वास बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी व्यक्त केला आहे.

मनोज जरांगेंचा निर्णय योग्य

मनोज जरांगे पाटील यांनी जो निर्णय घेतला आहे तो अतिशय योग्य असून अत्यंत विचारांती घेतलेला निर्णय आहे या निर्णयाच्या महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात फायदा होईल. असं बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी स्पष्ट केलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balasaheb thorat gave answer on mahavikas aghadi will win how many seats scj