लोकसभा निवडणूक निकाल जाहीर होऊन १५ दिवस झाले आहेत. तरीही निकालांची चर्चा कायम आहे. महाविकास आघाडीला ३० जागा मिळाल्या आहेत. अहमदनगर येथील जागा निलेश लंकेंनी जिंकली. निलेश लंकेंना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने तिकिट दिलं होतं. त्यांनी भाजपाच्या सुजय विखे पाटील यांचा पराभव केला. निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर पहिल्यांदाच लंके यांनी फेटा बांधला. बाळासाहेब थोरात यांच्या डोक्यावर फेटा बांधल्यावरच मी फेटा बांधेन असं ते म्हणाले होते. नगरच्या भाषणात त्यांनी तुफान फटकेबाजी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय घडलं?

“माझ्या निवडणुकीत कृष्णाची भूमिका ज्यांनी बजावली त्यांना आधी फेटा बांधा, नंतर मला.” असं निलेश लंके म्हणाले. ज्यानंतर आधी बाळासाहेब थोरात यांना फेटा बांधण्यात आला. महाराष्ट्रच्या राजकारणात विखे व थोरात यांच्यातील संघर्ष अनेकदा समोर आला आहे. लोकसभा निवडणुकीत निलेश लंके यांनी सुजय विखेंचा पराभव केल्यानंतर पहिल्यांदाच निलेश लंके आणि बाळासाहेब थोरात यांची भेट झाली. संगमनेर शहरात झालेल्या या सत्कार सोहळ्याप्रसंगी विखे यांचे कट्टर राजकीय विरोधक आवर्जून उपस्थित होते. यावेळी निलेश लंके म्हणाले, “लोकसभेत विजय झाल्यापासून मी फेटा बांधला नाही जर बांधला असेल तर माझं नाव बदला”, असं सांगत पहिला फेटा बाळासाहेब थोरात यांना या सत्कार सोहळ्याप्रसंगी फेटा बांधल्यानंतर निलेश लंके यांनी सत्काराचा स्वीकारला.

हे पण वाचा- VIDEO : “पवार इज पॉवर”, निलेश लंकेंनी इंग्रजीतून भाषण सुरू करताच उपस्थितांकडून दाद, सुजय विखेंना प्रत्युत्तर?

किंग होणं सोपं, पण थोरात किंगमेकर

“मी विजयी झालो मात्र विजयाचा आनंद मला आता खऱ्या अर्थाने मिळाला. विजयानंतर मी आजपर्यंत माझ्या डोक्यावर कुणालाही फेटा बांधू दिला नाही. मी सुध्दा थोरात यांच्यापेक्षा दहा पट हट्टी आहे. कौरव पांडवांच्या युद्धात पांडवांचा विजय श्रीकृष्णामुळे झाला. माझ्या निवडणुकीत श्रीकृष्णाची भूमिका पार पाडली ती बाळासाहेब थोरात यांनीच.माझ्या मतदारसंघात बाळासाहेब थोरात यांची यंत्रणा काम करत होती. त्यांनी काय काय काम केलं, हे मला निकालानंतर सगळं समजलं. मी विजयी झालो त्यावेळेस बाळासाहेब थोरात आजारी होते. त्यांना खूप आग्रह केला मात्र ते येऊ शकले नाहीत. कारमध्ये सलाईन घ्या.. इंजेक्शन घ्या हे पण तुम्ही या असा माझा आग्रह होता. म्हणूनच, ज्या माणसाने मला दिल्ली दाखवली त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी आज संगमनेर मध्ये आलोय. किंग होणं सोपं आहे, मात्र किंगमेकर होणं अवघड”, अशा शब्दात आपल्या विजयाचे किंगमेकर बाळासाहेब थोरात असल्याचे लंके यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balasaheb thorat is like lord krishna and king maker for me said mp nilesh lanke scj