नगर : भाजप हा देशात सर्वात मोठा पक्ष आहे. केंद्रात व राज्यातही भाजपचे सरकार आहे. त्यामुळे अन्य पक्षात जो कोणी दु:खी, अडचणीत आहे, ज्यांच्यावर अन्याय होत असेल, ज्यांना आसरा हवा आहे त्यांना आसरा देण्यास भाजप तयार आहे, अशा शब्दांत भाजपचे प्रदेश प्रवक्ते, आमदार राम शिंदे यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांना ‘ऑफर’ दिली आहे.  भाजप प्रवक्ते आ. राम शिंदे आज, शुक्रवारी नगरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीनंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते थोरात यांनीही मला पक्षाबाहेर ढकलण्याचा प्रयत्न होत आहे, असे वक्तव्य केले. याकडे लक्ष वेधले असता आ. शिंदे यांनी ही ‘ऑफर’ दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 आमदार बच्चू कडू यांनी महाविकास आघाडीचे १५ आमदार संपर्कात असल्याचा दावा केला, यासंदर्भात बोलताना आ. शिंदे म्हणाले की, बच्चू कडू हे भाजप व बाळासाहेबांची शिवसेनेच्या सहयोगी पक्षाचे आमदार आहेत, माजी मंत्री आहेत. त्यामुळे ते निश्चितच अधिकृत माहितीशिवाय बोलणार नाहीत. महाविकास आघाडीमध्ये सध्या चलबिचल सुरू आहे. कोणाचा कोणाला मेळ लागायला तयार नाही. तिन्ही पक्ष एकमेकांना सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. कोण कधी फुटेल याचा थांगपत्ता लागत नाही, अशी त्यांची अवस्था आहे. ‘पदवीधर’च्या निवडणुकीत महाविकास आघाडी तोंडघशी पडली. असे चित्र आणखी कोठेकोठे पाहायला मिळेल. आमदार कडू म्हणतात त्यात तथ्य आहे, हे येणाऱ्या कालखंडात पाहायला मिळेल.

 भाजपाने पाठिंबा देऊनही निवडून आल्यानंतर आमदार सत्यजित तांबे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला नाही, याकडे लक्ष वेधले असता शिंदे म्हणाले, की आम्ही पाठिंबा दिला म्हणूनच ते निवडून आले आणि आम्ही आमची ‘कमिटमेंट’ करून दाखवली. त्यांनीही त्यांची ‘कमिटमेंट’ करून दाखवली आहे. ‘आगे, आगे देखो होता है क्या?’

 पुण्यातील राष्ट्रवादीच्या शिबिरात आमदार नीलेश लंके यांनी अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. त्यासंदर्भात बोलताना राम शिंदे म्हणाले की तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. परंतु राष्ट्रवादीमध्ये नेमकी उलटी प्रक्रिया सुरू आहे. गेल्या २० वर्षांत त्यांना त्यांचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरवता आला नाही आणि यापुढेही ठरवता येणार नाही.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balasaheb thorat offer to join bjp from ram shinde ysh
Show comments