Balasaheb Thorat : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठं बहुमत मिळालं. आता महायुतीला मिळालेल्या यशानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन होणार आहे. ५ डिसेंबर रोजी महायुतीच्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभवाचा धक्का बसला. एवढंच नाही राज्यातील काँग्रेसच्या काही दिग्गज नेत्यांना देखील पराभव पत्कारावा लागला. विधानसभेला आलेल्या अपयशानंतर आता नेत्यांकडून विचार मंथन आणि पराभवाची कारणं काय आहेत? यावर चर्चा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील काँग्रेसला आलेल्या अपयशाबाबत भाष्य केलं आहे. तसेच काँग्रेसला आलेल्या अपयशाचं कारणं वेगळी असल्याचं सूचक भाष्य बाळासाहेब थोरात यांनी केलं.

बाळासाहेब थोरात काय म्हणाले?

महायुतीचं सरकार स्थापन होण्यासाठी लागत असलेल्या वेळेबाबत बोलताना बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं की, “आता त्यांच्याकडे संख्याबळ एवढं झालं की त्यांना आवरता आवरेना. नवीन आमदार त्यांना आवरत नाहीत असं दिसतं. त्यामुळे त्यांच्यात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं ही वस्तुस्थिती आहे.एवढा स्ट्राईक रेट कसा असू शकतो? २८८ उमेदवार उभे केले असते तर २५६ उमेदवार विजयी झाले असा कुठे इतिहास आहे का? आता महायुतीकडे एवढं मोठं संख्याबळ आहे ते संख्याबळ त्यांनाच त्रासदायक ठरतंय”, असा हल्लाबोल बाळासाहेब थोरात यांनी महायुतीवर केला.

New CM of Maharashtra Devendra Fadnavis| BJP announced Maharashtra New Chief Minister
Devendra Fadnavis : मुख्यमंत्रि‍पदाचा मार्ग मोकळा होताच देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “एक है तो सेफ है…”
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
Devendra Fadnavis new Chief Minister of Maharashtra
Maharashtra New CM : देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार; विधीमंडळ पक्षनेतेपदी एकमताने निवड
Who is gajabhau
“असशील तिथून तुला उचलणार”, मोहित कंबोज यांनी धमकी दिलेला गजाभाऊ नेमका कोण? महायुतीला सातत्याने केलंय टार्गेट!
Sachin Tendulkar Meets Vinod Kambli
Sachin Tendulkar Meet Vinod Kambli : सचिन भेटायला आला पण विनोद कांबळीला उभंही राहता आलं नाही, मैत्रीतला ‘तो’ क्षण राज ठाकरेही पाहातच राहिले!
Girgaon Marathi Marwari Conflict
“इथे मराठीत न बोलता..”, गिरगावमध्ये मराठी भाषेच्या गळचेपीवर भाजपा आमदार मंगल प्रभात लोढांची मोठी प्रतिक्रिया
mahayuti vidhan sabha result
कलंकितांवरून कोंडी; शिवसेनेच्या मंत्र्यांची नावे भाजपने ठरविण्यावर आक्षेप; राष्ट्रवादीसमोरही पेच

हेही वाचा : ठरलं! देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री; उद्या होणार शपथविधी

महायुतीत एकनाथ शिंदेंचा सन्मान राहणार की नाही?

“विधानसभेच्या निवडणुका महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात झाल्या. मात्र, आता निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांचा किती सन्मान राहील हे माहिती नाही. सध्या एकनाथ शिंदे आजारी असू शकतात. पण शेवटी एवढ्या मेहनतीनंतर देखील त्यांचा सन्मान आहे की नाही हा प्रश्न आहे”, असं बाळासाहेब थोरातांनी म्हटलं.

काँग्रेसच्या अपयशाची कारणं काय?

लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला महाराष्ट्रात मोठं यश मिळालं. काँग्रेस राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र, विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला अपयश आलं. यावरून काँग्रेस संपत चाललेला पक्ष असल्याची टीका सातत्याने महायुतीच्या नेत्यांकडून केली जाते. असा प्रश्न बाळासाहेब थारात यांनी विचारण्यात आला असता यावर उत्तर देताना त्यांनी म्हटलं की, “असं आहे की तीन महिन्यांपूर्वी आमचं यश होतं. मात्र, तीन महिन्यांनंतर आमचं यश गेलं. आता त्याची कारणं खूप वेगळी आहेत. मात्र, तसं होणार नाही, कारण काँग्रेस ही काँग्रेस आहे आणि आम्ही काम करत राहणार आहोत”, असं बाळासाहेब थारातांनी म्हटलं.

‘महायुतीत खातेवाटपावरून गडबड’

मारवाडी या गावातील नागरिकांनी बॅलेटपेपरवर मतदान घेण्याची मागणी केली होती. मात्र, त्यांची मागणी प्रशासनाने फेटाळून लावली.दरम्यान, यावर बोलताना बाळासाहेब थारात म्हणाले, “मारवाडीमध्ये मतदान होऊ दिलं नाही. मग तुम्ही दडपशाहीने किती काळ लोकांना दाबण्याचा प्रयत्न करणार आहात? लोकांच्या शंकेचं निरसन करण्याऐवजी तुम्ही लोकांना दाबण्याचा प्रयत्न करत आहात. आता महायुतीमध्ये खाते वाटपावरून काहीतरी गडबड सुरु आहे. कारण संख्याबळ एवढं झालं आहे की ते त्यांना आवरता येईना. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात निवडणुका लढवल्या. त्यामुळे त्यांचा किती सन्मान होईल? हे आज सांगता येणार नाही”, असंही थोरातांनी म्हटलं.

Story img Loader