सांगली: कोट्यावधीचा निधी आणल्याचा दावा करणार्‍या पालकमंत्री सुरेश खाडे यांनी मिरजेतील रस्त्यांची अवस्था काय आहे हे पदयात्रा करून पाहावे. केवळ मीच विरोधी उमेदवार निश्‍चित करतो असे सांगत जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे उद्योग बंद करावेत असे आव्हान जिल्हा बँकेचे संचालक व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाळासाहेब वनमोरे यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्याचे कामगार व जिल्ह्याचे पालकमंत्री असताना मंत्री खाडे हे केवळ मिरज मतदार संघातच वावरत असतात. माध्यमाद्बारे मतदार संघासाठी शेकडो कोटींचा निधी आणल्याचे सांगून मतदारांना भुलविण्याचे काम करीत आले आहेत. गेल्या पंधरा वर्षाच्या कारकीर्दीत शहरातील रस्त्यांची सुधारणा करता आली नाही. वाहतुकीची वारंवार होणारी कोंडी तर दूर करता आली नाहीच, पण औद्योगिक वसाहतमधील अनेक कारखाने बंद पडत आहेत, तर काही उद्योग बाहेर निघाले आहेत.

नवीन रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी एखादा प्रकल्पही आणू शकले नाहीत. मिरज शहरातील सर्वात वर्दळीचा व महत्वाचा असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यासाठी शंभर कोटी, २८ कोटी आणि १७ कोटी रूपये मंजूर केल्याचे सांगतात, मात्र रस्त्याची दुरावस्था त्यांना दूर करता आलेली नाही. केवळ थापेबाजी करीत भुलविण्याचे काम ते करत आले आहेत. अशा भूलथापांना मिरजकर आता बळी पडणार नाहीत असेही वनमोरे यांनी सांगितले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balasaheb vanamore challenged that guardian minister suresh khade should go on a walk to see the condition of the roads in miraj dvr
Show comments