अलिबाग : मुंबई गोवा महामार्गाच्या कामाला गती देता यावी यासाठी आजपासून (२७ ऑगस्ट) गणेशोत्सव संपेपर्यंत मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. वाहतूक पोलिसांकडून याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना यातून सूट देण्यात आली आहे.

मुंबई गोवा महामार्गाचे काम सध्या सुरू आहे. या कामाला गती देता यावी यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. रस्त्याचे काम सुरू असल्याने सध्या एका मार्गिकेतून वाहतूक सुरू आहे. या ठिकाणी अवजड वाहनामुळे सातत्याने वाहतूक कोंडी निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक नियंत्रित करण्यात यावी, अशी मागणी महामार्ग प्राधिकरणाने केली होती. त्यानुसार याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली. त्याचबरोबर गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते, त्यांचा प्रवास सुरक्षित आणि निर्विघ्न व्हावा या दृष्टीनेही हा निर्णय घेण्यात आला.

platform ticket sales are temporarily restricted at major Mumbai stations
Mumbai Local : वांद्रे स्थानकातील चेंगराचेंगरीनंतर मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; गर्दी टाळण्याकरता दादर, ठाणे, कल्याणच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना!
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
MMRDA, Kanjurmarg metro 6 carshed
कांजूरमार्ग कारशेड पुन्हा वादात, मेट्रो ६ मार्गिकेच्या कारशेडच्या कामाला न्यायालयाची स्थगिती
Sunday block on Central Railway, Western Railway,
मध्य, पश्चिम रेल्वेवर रविवारी ब्लॉक
Western Expressway, Repair of bridges Western Expressway, Western Expressway latest news,
मुंबई : पश्चिम द्रुतगती महामार्गावरील ४४ पूल व भुयारी मार्गांची दुरुस्ती
Work of second tunnel in Matheran hill of Baroda Mumbai highway completed
बडोदा मुंबई महामार्गाच्या माथेरान डोंगरातील दुसऱ्या बोगद्याचे काम पूर्ण
The action taken by the Maharashtra Pollution Control Board against the Mercedes Benz company is controversial Pune news
शहरबात: मर्सिडीज बेंझ, राज्यातील उद्योग पलायन अन् शासकीय यंत्रणा…
Shaktipeeth Highway, Mahayuti , Mahavikas Aghadi, cancellation of Shaktipeeth Highway,
शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या अधिसूचनेनंतर महायुती – ‘मविआ’त राजकीय शह – काटशह

हेही वाचा >>>लवकरच चंद्रावर घरे देण्याचे आश्वासनही देतील; उद्धव ठाकरे यांची भाजप सरकारवर टीका

१६ टनांपेक्षा जास्त क्षमता असलेल्या ट्रक, मल्टिएक्सल, ट्रेलर यांना ही बंदी लागू असणार आहे. २७ ऑगस्ट २०२३ ते २८ सप्टेंबर २०२३ या कालावधीसाठी मुंबई-गोवा महामार्गावर हे बंदी आदेश लागू राहणार आहेत. या कालावधीत अवजड वाहतूक ही पर्यायी मार्गानी वळवली जाणार आहे. पोलीस उप आयुक्त वाहतूक तिरुपती काकडे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

पर्यायी मार्ग कोणता?

पळस्पे फाटा तसेच कोन फाटा येथून मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाचा वापर करून, खालापूर येथून पाली वाकणमार्गे अवजड वाहतूक वळविण्यात येणार आहे.