अलिबाग – पवसाळ्यात वर्षा सहलींदरम्यान पर्यटकांच्या होणाऱ्या मृत्यूची दखल घेऊन, जिल्हा प्रशासनाने देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉईंट आणि ताम्हाणी घाटातील वर्षा सहलींवर बंदी घातली आहे. मात्र या निर्णयामुळे पर्यटन व्यवसाय धोक्यात येण्याची शक्यता आहे. स्थानिकांचा रोजगार बुडणार असल्याने योग्य खबरदारी घेऊन वर्षा पर्यटन सुरू ठेवण्याची विनंती स्थानिकांनी केली आहे.

सहलीसाठी येणारे पर्यटक दगावण्याच्या घटना नवीन नाहीत. गेल्या दोन वर्षांत ३५ हून अधिक पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे. यात प्रामुख्याने कर्जत, खोपोली, मुरुड आणि माणगाव पावसाळी पर्यटन केंद्रांचा समावेश आहे. या दुर्घटनांना पर्यटकांचा आततायीपणा कारणीभूत ठरतो आहे. मद्यप्राशन करून पाण्यात उतरणे, स्थानिकांच्या सुचनांकडे दुर्लक्ष करणे, भौगोलिक परीस्थितीचे ज्ञान नसणे यासारखे घटक यास कारणीभूत ठरत आहेत. जिल्ह्यात सातत्याने घडणाऱ्या या दुर्घटना लक्षात घेऊन देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉईंट आणि ताम्हाणी घाटातील पावसाळी पर्यटन केंद्रांवर प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. याबाबातचे आदेश माणगावचे उपविभागीय अधिकारी उमेश बिरारी यांनी जारी केले आहेत. पण या आदेशानंतर बराच गदारोळ उडाला. पर्यटकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. स्थानिकांचे रोजगार बुडत असल्याने त्यांनीही यावर आक्षेप नोंदवला. अखेर प्रशासनाने ही बंदी मागे घ्यावी अशी मागणी केली जात आहे.

Ulhasnagar Water Supply, Women Movement ,
ठाणे : “पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत मागे हटणार नाही”, संतप्त नागरिकांचा पाणीपुरवठा कार्यालयात ठिय्या
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Panchgani Mahabaleshwar tourism, Panchgani ,
पाचगणी, महाबळेश्वरच्या पर्यटनाला ‘थंड’ प्रतिसाद; निवडणुकांचा फटका
indian tectonic plate
तिबेट खालील भारतीय टेक्टोनिक प्लेट दुभंगणार? भूवैज्ञानिकांनी व्यक्त केली चिंता; याचा काय परिणाम होणार?
Forest Minister Ganesh Naik announced to develop tiger and leopard habitat
वन्य प्राणी अनुभव, वाघ बिबट्या सफारी, वन्यजीव पर्यटन महाराष्ट्र, प्राणी वस्ती संरक्षण, वाघ – बिबट्यांचे अधिवास क्षेत्र विकसित करणार
Thane Municipal Corporation prepares water supply plan for next 30 years amid urbanization
अवाढव्य वाढलेल्या ठाण्याची तहान वाढीव पाणी पुरवठा भागवेल का?
Chandrakant Patil instructs forest officials to ensure safety of hills in Pune
पुणे शहरातील टेकड्याच्या सुरक्षितेतच्यादृष्टीने उपाययोजना करा, वन अधिकार्‍यांना चंद्रकांत पाटील यांच्या सूचना
congress mla vijay wadettiwar criticize cm devendra fadnavis over crime increase in state
चंद्रपूर : वडेट्टीवार म्हणतात, ‘मुख्यमंत्री फडणवीसांचा धाक नाही, त्यामुळेच गुन्हेगारी…’

हेही वाचा – Petrol-Diesel Price on 24 June: राज्यातील अनेक शहरात पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

जिल्ह्यात धरणांवर आणि धबधब्यांवर वर्षासहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांचे प्रमाणही मोठ असते. पावसाचा जोर वाढल्यास या धरणांमधून आणि धबधब्यांमधून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह अचानक वाढतो. या प्रवाहाचा अंदाज न आल्याने पर्यटक वाहून जातात. समुद्र किनाऱ्यावरील परिस्थिती काहीशी वेगळी असते. पर्यटकांना समुद्राला येणाऱ्या भरती ओहोटीचा अंदाज नसतो. याशिवाय पाण्यातील आंतर्गत प्रवाहांची माहिती नसते. स्थानिकांच्या सुचनांकडे दुर्लक्ष करून पर्यटक खोल पाण्यात उतरतात आणि नंतर पाण्याचा अंदाज न आल्याने बुडतात. म्हणून सरसकट वर्षा पर्यटन केंद्रांवर बंदी घालणे हा निर्णय स्थानिकांच्या मुळावर येणारा असल्याचा आरोप केला जात आहे.

देवकुंड धबधबा परीसरात दरवर्षी हजारो पर्यटक येत असतात. स्थानिक परिस्थितीचा अंदाज न आल्याने या ठिकाणी २०१८ पूर्वी पर्यटक बुडण्याच्या घटना घडल्या होता. मात्र स्थानिकांनी विशेष खबरदारी घेऊन नंतर हा परिसर पर्यटकांच्या दृष्टीने सुरक्षित कसा होईल यासाठी प्रयत्न केले. येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला लाईफ जॅकेट देणे, त्यांना स्थानिक गाईड उपलब्ध करून, ठिकठिकाणी सूचना फलक लावणे यासारखे उपक्रम राबविले. त्यामुळे हा परिसर अधिक सुरक्षित झाला. २०० ते २५० तरुणांना यातून रोजगार उपलब्ध झाला. त्यामुळे अलिकडच्या काळात या ठिकाणी एकही दुर्घटना घडली नाही. अशा परिस्थितीत वर्षासहलींवर निर्बंध लादणे कितपत योग्य आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यामुळे वर्षा सहलींवर बंदी आणण्यापेक्षा ही ठिकाणे पर्यटकांच्या दृष्टीने अधिक संरक्षित कशी होतील यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे मत या निमित्ताने व्यक्त केले जाते आहे.

पर्यटन स्थळांवर अपघात टाळण्यासाठी करावयाच्या उपाय योजना

पर्यटकांना स्थानिक परिस्थितीची माहिती देणारे सूचना देणारे फलक बसवणे. धरण, धबधबे, नद्या आणि तलावांमध्ये वर्षासहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी पोहण्यासाठी सुरक्षित ठिकाणे निश्चित करणे, रिंग बोयाज, लाईफ जॅकेट आणि मदत व बचाव लागणारी सामुग्री सज्ज ठेवणे आवश्यक आहे. पावसाचा जोर वाढल्यास पाण्याची पातळी अचानक वाढू शकते. याची जाणीव ठेऊन पर्यटकांना सतर्क करणे गरजेच आहे.

हेही वाचा – “नागपूरचे भाजपा नेते मोदींविरोधात बोलायचे, पण…”, नाना पटोलेंचा टोला; म्हणाले, “सत्तेचा गर्व…”

सतत होणाऱ्या अपघातांमुळे येथील पर्यटनस्थळांचे नकारात्मक चित्र तयार झाले आहे. त्याचा पर्यटन व्यवसायावर परिणाम होत आहे. येणाऱ्या पर्यटकांना योग्य सुचना दिल्या गेल्या, सहलीसाठी सुरक्षित ठिकाण निश्चित केले तर या दुर्घटना टाळता येऊ शकतील. पर्यटकांमुळे स्थानिकांना रोजगार मिळत आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी स्थानिकांनी काही प्रमाणात पुढे येण गरजेच आहे. पर्यटनस्थळांवर बंदी घालणे हा यावरचा उपाय नाही – महेश सानप, संचालक वाईल्डर वेस्ट एडव्हेंचर

स्थानिकांच्या पुढाकाराने, शाश्वत पर्यटन विकास कसा होऊ शकतो याचे देवकुंड धबधबा आदर्श उदाहरण आहे. शासनाच्या कुठल्याही मदतीशिवाय तरुणांनी एकत्र येऊन हा परिसर विकसित केला आहे. प्रशासन अशा पद्धतीने बंदी आदेश लागू करून स्थानिकांच्या रोजगारावर पाय देण्याचे काम करत आहेत. लोकांचे जीव महत्त्वाचे आहेत. पण सरसकट बंदी घालणे हा त्यावरचा उपाय होऊ शकत नाही. – संजय यादवराव, कार्याध्यक्ष, कोकण भूमी प्रतिष्ठान

Story img Loader