राज्यात प्लॅस्टिक आणि थर्माकोल वस्तूंवर बंदी घालण्याची अधिसूचना राज्य सरकारने काढली होती. त्यानंतर हा नियम राज्यभरात कमी अधिक प्रमाणात लागू करण्यात आला. दुधाच्या पिशव्यांचा वाद त्यानंतर बराच काळ सुरु होता. दुधाची पिशवी बंद झाली तर दूध कशातून देणार असा प्रश्न असल्याने दुधाची पिशवी बंद करायची का नाही असा प्रश्न होता. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या उद्योगाला नोटीस बजावून उत्पादन बंद करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर यापुढे दुधाच्या पिशव्यांसाठी प्लास्टिक पिशव्यांचे उत्पादनच न करण्याचा निर्णय उत्पादकांच्या संघटनेने घेतला आहे. त्यामुळे दूधसंकलनाचा प्रश्न निर्माण होणार आहे. मात्र येत्या गुरुवारी होणाऱ्या बैठकीत या मुद्द्यावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. प्लॅस्टिक पिशव्यांची विल्हेवाट तसेच त्याचा पुनर्वापर किंवा पुनर्प्रक्रिया करण्यासंदर्भात विशिष्ट मुदतीत आराखडा सादर करण्यात प्लास्टिक उत्पादकांना अपयश आल्यामुळे अखेर प्रदूषण मंडळाने पिशव्यांचे उत्पादन बंद करावे असे सांगितले.
दुधाच्या प्लॅस्टिक पिशव्या बंद होणार?
प्लॅस्टिक पिशव्यांची विल्हेवाट तसेच त्याचा पुनर्वापर किंवा पुनर्प्रक्रिया करण्यासंदर्भात विशिष्ट मुदतीत आराखडा सादर करण्यात प्लास्टिक उत्पादकांना अपयश
Written by लोकसत्ता ऑनलाइन
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 24-11-2018 at 14:40 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ban on plastic bag of milk in state