एफआरपीत दीडशे रुपये वाढवून दिल्याचे भासविले जात असताना दुसरीकडे रिकव्हरीचा बेस पाव टक्क्याने वाढवून फसवणूक होत असल्याचा आरोप करत आता ऊसदरासाठी येत्या गुरुवारपासून (दि. १७) राज्यभर दोन दिवसीय लाक्षणिक ऊसतोड बंद आंदोलन छेडणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख व माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला. कराडमध्ये ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

हेही वाचा- “शिंदे सरकारचं आणखी एक अपयश”, ऊर्जा उपकरण निर्मिती प्रकल्प राज्याच्या हातून गेल्याने सुप्रिया सुळेंचं टीकास्र!

Bad weather in Mumbai Measures against pollution Mumbai print news
मुंबईत निवडणुकीपर्यंत प्रदूषणाचा त्रास; मनुष्यबळाअभावी पालिकेची यंत्रणा हतबल
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Issues of sugar factory in assembly elections is troubling candidate
विधानसभा निवडणुकीत साखर कारखानदारीचे मुद्दे पेटले!
Deputy Chief Minister Devendra Fadnavis announced that will waive off the loans of farmers after mahayuti govt
“शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
Ajit Pawar, sugar factory, Amit Shah allegation,
आजारी साखर कारखान्यांवर अजित पवार गटाचाही कब्जा, अमित शहांच्या आरोपानंतर विरोधी नेत्यांसह सत्ताधारी गटाचीही चर्चा
Amit Shah alleges that Ajit Pawar group is occupying the sugar factories Print politics news
आजारी साखर कारखान्यांवर अजित पवार गटाचाही कब्जा; अमित शहांच्या आरोपानंतर विरोधी नेत्यांसह सत्ताधारी गटाचीही चर्चा

ऊस उत्पादकांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करून शेट्टी म्हणाले की, राज्यकर्ते आणि साखर कारखानदार संगनमताने ऊस उत्पादकांची लुट करीत आहेत. चालू हंगामात उसाला विनाकपात एकरकमी एफआरपी व हंगाम संपल्यानंतर ३५० रूपये साखर कारखानदारांनी ऊस उत्पादकांना द्यावेत, या प्रमुख मागणीसाठी ‘स्वाभिमानी’कडून आंदोलन पुकारण्यात आले आहे.

उसाच्या उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. खते, औषधे, मजुरी वाढली असताना ऊसदर मात्र, त्याप्रमाणात वाढलेला नाही. कृषी मुल्य आयोग एफआरपी ठरवताना या बाबी का लक्षात घेत नाही ते कळत नाही. ऊसापासून तयार करण्यात येणार्‍या उपपदार्थांचा नफा शेतकर्‍यांना दिला जात नाही. त्याचा हिशोबही कारखानदार देत नाहीत. त्यामुळे उपपदार्थांचा नफा शेतकर्‍यांना मिळावा अशी आमची मागणी आहे. एफआरपी ठरविण्याचे सूत्र नव्याने तयार करायला हवे अशी मागणी आम्ही कृषी मुल्य आयोगाकडे केली असता केंद्र सरकारकडे याबाबतची शिफारस करणार असल्याचे कृषी मुल्य आयोगाच्या अध्यक्षांनी सांगितले.

हेही वाचा- शिंदे गटात धुसफूस, दादा भुसेंवर सुहास कांदेंची नाराजी?; म्हणाले…

चालू हंगामात दीडशे रूपये वाढवून दिल्याचे सांगितले जात असले तरी ही शेतकर्‍यांची फसवणूकच आहे. १० टक्के रिकव्हरीला २,९०० रूपये होते. आता ३,०५० रूपये होणार असे भासविले जात आहे. परंतु, प्रत्यक्षात २,९७५ रूपयेच मिळणार आहेत. कारण रिकव्हरीचा बेस वाढवून तो १० टक्केवरून १०.२५ टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना केवळ ७५ रूपयेच वाढवून मिळणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
हा ऊसदर उत्पादन खर्चाचा विचार करता अगदीच कमी असल्याने साखर कारखानदारांनी यंदा उसाला विनाकपात एकरकमी एफआरपी व हंगाम संपल्यानंतर ३५० रूपये ऊस उत्पादकांना द्यावेत, या मागणीसाठी येत्या १७ व १८ नोव्हेंबरला राज्यभर लाक्षणिक ऊसतोड बंद आंदोलन छेडण्यात आल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.

हेही वाचा- “…फक्त डोळ्यात अश्रू येणं बाकी होतं” अटकेनंतर घडलेल्या घडामोडींवर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया

पंतप्रधानांनीही तीन महिन्यांची पदयात्रा काढावी

राहुल गांधींच्या भारत जोडो पदायात्रेचे आपण समर्थन करतो. खरे तर मला त्यात सहभागी व्हायचे होते. पण ऊसदर आंदोलनामुळे शक्य झाले नाही. तरीही माझा अन्य राज्यात जावून राहुल गांधींच्या पदयात्रेत सहभाग नोंदवताना त्यांना समर्थन द्यायचे असेल. अशा पदयात्रेमुळे समाज समजेल, लोकांशी बोलता येईल. सामाजिक स्थिती समजेल. या पदयात्रेला सर्वांनी पाठिंबा द्यायला हवा. मीही अशी पदयात्रा काढण्याचा विचार करतोय. पंतप्रधानांनीही तसा विचार करावा. तीन महिन्यांची पदयात्रा काढावी अशी अपेक्षा राजू शेट्टी यांनी व्यक्त केली. भविष्यात शेतकरी म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.