लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

अलिबाग : दहा दिवसांच्या पाहूणचार घेतल्यानंतर मंगळवारी गणेशोत्सवाची सांगता होणार आहे. या गणेश विसर्जन मिरवणूकी दरम्यान रायगड जिल्ह्यात डॉल्बी साऊंड सिस्टीम, लेझर बीम लाईट आणि स्नो स्प्रे, हीट स्प्रे यांच्या वापरावर जिल्हा प्रशासनाने यांनी निर्बंध घातले आहेत. याबाबतचे आदेश निवासी उप जिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी याबाबतची अधिसुचना जारी केली आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणूकी दरम्यान आवाजाची मर्यादा गणेशभक्तांना सांभाळावी लागणार आहे. अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

country first heart liver transplant surgery success led by dr anvay mulay
देशातील पहिली हृदय-यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी!
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Pimpri Chinchwad Anti Terrorism Branch exposed gang of fake police verification certificates
बनावट पोलीस पडताळणी प्रमाणपत्र देणार्‍या टोळीचा पर्दाफश
fire broke out at scrap warehouse at Kudalwadi in Chikhli on Monday morning
पिंपरी : चिखलीतील गोदामांच्या आग प्रकरणी जागा मालकाचा शोध
curd and coffee for tan removal
Tan Removal Remedy : चमकदार त्वचेसाठी घरच्या घरी करा उपाय! दही व कॉफीचा लावा मास्क; पण डॉक्टरांचे मत काय?
white onion Alibaug, Raigad, white onion,
रायगड : अलिबागच्या पांढऱ्या कांद्याच्या कक्षा रुंदावणार, एक हजार हेक्टरवर पांढऱ्या कांद्याच्या लागवडीचे उद्दिष्ट
difference between shivlinga jyotirlinga
शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग यांच्यात नेमका फरक काय?
Sale of fake oil Bhiwandi, fake oil Bhiwandi,
ठाणे : ब्रँडचे नाव वापरून बनावट तेलाची विक्री

उत्सवप्रिय कोकणात उद्या गणेशोत्सवाची सांगता, लाडक्या गणेशाला उद्या वाजत गाजत निरोप दिला जाणार आहे, मात्र विसर्जन मिरवणूकी दरम्यान डॉल्बी साऊंण्ड सिस्टीम आणि लेझर बीम लाईट, तसेच स्नो स्प्रे या सारख्या साहित्याचा वापर करण्याचा विचार असेल तर तो आवरता घ्या, कारण असे करणे महागात पडू शकते. जिल्हा प्रशासनाने याबाबतची अधिसूनचा जारी केली आहे. लेझर लाईटमुळे डोळ्यांच्या पटलांना इजा होण्याची शक्यता असते, तर डीजेच्या आवाजामुळे बहिरेपणा आणि हृदयविकाराचे झटके येण्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे खबरदारी म्हणून प्रशासनाच्या वतीने याबाबतची अधिसूचना जारी केली आहे.

आणखी वाचा-वेळप्रसंगी सरकारला नावडते निर्णय दिल्याने न्यायालयाची प्रतिमा उंचावते : न्या. अभय ओकांचे स्पष्ट प्रतिपादन

भारतीय नागरीक सुरक्षा संहीता २०२३ च्या कलम १६३ (१) अन्वये हा प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे. आदेशाचे उल्लघन करणाऱ्यां विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ प्रमाणे कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे गणेश विसर्जन करतांना आवाजाची मर्यादा पाळा असे आवाहन पोलीसांनी केले आहे.

Story img Loader