संगमनेर : शिर्डी विमानतळाच्या २५ किलोमीटर परिघातील वायुक्षेत्रात प्रखर लेझर प्रकाश किरण आकाशात सोडण्यास बंदी घालण्याचे आदेश शिर्डी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांनी जारी केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शिर्डी विमानतळ येथे दिवसा व रात्री वेगवेगळ्या विमान कंपन्यांची विमाने व हेलिकॉप्टर उतरत आणि उड्डाण करीत असतात. रात्रीच्यावेळी वैमानिकांना दिशा आणि ठिकाण निश्चित करण्यासाठी धावपट्टीवर आणि हवाई वाहतूक नियत्रंण (एटीसी) टॉवरद्वारे लाईटचा उपयोग केला जातो. शिर्डी विमानतळ परिसरातील २५ किलोमीटर परिघात उच्च शक्तीच्या लेझरमुळे वैमानिकांचे लक्ष विचलित होणे आणि संभाव्य अक्षमतेमुळे विमानाच्या कार्यप्रणालीत गंभीर अडथळे येऊ शकतात.

हेही वाचा – Supriya Sule : संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन सुप्रिया सुळेंचे सरकारला नऊ प्रश्न; म्हणाल्या, “वाल्मिक कराड…”

हेही वाचा – Satej Patil : आगामी महापालिकेच्या निवडणुका काँग्रेस स्वतंत्र लढणार की आघाडीत? सतेज पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, “शक्य असेल तिथे…”

सहज हाताळता येणाऱ्या (हॅंड हेल्ड लेझर) उपकरणाची कमी किंमत व बाजारातील सहज उपलब्धतेमुळे अशा घटनांची संख्या वाढून विमानाच्या महत्वाच्या टप्प्यामध्ये वैमानिक विचलीत होतात किंवा तात्पुरते अक्षम होतात. उड्डाण आणि लँडिंगच्या महत्वाच्या टप्प्यामध्ये अशा कृती विमानतळ परिसराच्या आसपास झाल्यास विमान वाहतुकीला अधिक धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या सर्व बाबींचा विचार करून विमान वाहतुकीला अडथळा येऊ नये, कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी वरील आदेश जारी करण्यात आल्याचे आहेर यांनी म्हटले आहे.