लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

अलिबाग : रेवस येथील बँक ऑफ इंडीयाच्या शाखा व्यवस्थापकाला मारहाण करणे, ग्राहकाला चांगेलच महागात पडले आहे. मारहाण प्रकरणी आरोपी सुरज परशुराम कोळी राहणार बोडणी, याला अलिबागच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली तसेच पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावला.

Kavita Badla murder case Vasai court sentences four accused to life imprisonment
कविता बाडला हत्या प्रकरण : चार आरोपींना वसई न्यायालयाने सुनावली जन्मठेप
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Torres case, police , accused, High Court,
आरोपी न सापडण्यास पोलीसच जबाबदार, टोरेसप्रकरणी उच्च न्यायालयाचे खडेबोल
Asaram Bapu
Asaram Bapu : आसाराम बापूला २०१३च्या बलात्कार प्रकरणात दिलासा! राजस्थान उच्च न्यायालयाने मंजूर केला अंतरिम जामीन
Jaideep Apte , bail , High Court,
मालवण शिवपुतळा दुर्घटना प्रकरण, जयदीप आपटे याला उच्च न्यायालयाकडून जामीन
Accused of murdering young woman remanded in custody Pune news
पुणे : तरुणीचा खून करणाऱ्या आरोपीला कोठडी
Rhona Wilson
रोना विल्सन, सुधीर ढवळे यांना जामीन; शहरी नक्षलवाद प्रकरण
Satara District Sessions Judge , pre-arrest bail ,
अटकपूर्व जामिनाच्या मागणीसाठी सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश उच्च न्यायालयात

सदर घटना ही २२ मे २०२० रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली होती. अभिशेख गणेश वर्मा हे स्टेट बँक ऑफ इंडीयाच्या रेवस शाखेत शाखा व्यवस्थापक म्हणून काम पाहत होते. यावेळी आरोपी सुरज परशुराम कोळी हे बँकेत आले. त्यांनी कर्जाचा थकीत हप्ता बचत खात्यातून कट झाल्याचा राग मनात शाखा व्यवस्थापक यांना मारहाण केली आणि बँकेच्या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला.

आणखी वाचा-ऐतिहासिक नळदुर्ग भुईकोट किल्ल्यातील नर-मादी धबधबा सुरु

याबाबत मांडवा सागरी पोलीस ठाण्यात आरोपी सुरज कोळी यांच्या विरोधात भादवी कलम ३३२, ३५३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीसांनी तपास करून या आरोपी विरोधात अलिबाग येथील जिल्हा व सत्र न्यायालयात याबाबतचे दोषारोपपत्र दाखल केले होते. सदर प्रकरणाची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस राजंदेकर यांच्या न्यायालयासमोर झाली. यावेळी शासकीय अभियोक्ता म्हणून स्मिता राजाराम धुमाळ पाटील यांनी काम पाहीले. सुनावणी दरम्यान एकूण १० जणांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. ज्यात फिर्यादी अभिषेक वर्मा, प्रत्यक्षदर्शी अगेंद्र कुमार ठाकूर,टेक्निशियन गिरीश घरत, तपासिक अंमलदार अतुल मडके यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. दोन्ही बाजूचे युक्तीवाद ऐकल्यानंतर जिल्हा न्यायाधीश राजंदेकर यांनी शासकीय अभियोक्ता धुमाळ- पाटील यांचा युक्तीवाद ग्राह्य धरला आणि साक्षी पुरावे लक्षात घेऊन आरोपी सुरज कोळी यास शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी तसेच लोकसेवकांना मारहाण केल्या प्रकरणी दोषी ठरवले.

Story img Loader