Maharashtra Government Holidays List 2023: १८८१ च्या कायद्याच्या अंतर्गत, राज्य सरकार, केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेश आपल्या अख्तयारीतील बँक सुट्ट्यांची यादी करतात. दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी भारतात बँक व सरकारी कार्यलयांना सुट्टी असते, त्यामुळे त्या दिवशी बँका बंद असतात. पण या व्यतिरिक्त राज्यातील सर्व बँक व सरकारी कार्यालये राष्ट्रीय उत्सव व सणाच्या निमित्ताने बंद असतात. येत्या नववर्षात म्हणजेच २०२३ मध्ये नेमक्या कोणत्या दिवशी बँक बंद असणार आहे याविषयी माहिती देणारे परिपत्रक महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने जारी करण्यात आले आहे. २०२३ मध्ये वर्षभरात रविवार व दुसरा आणि चौथा शनिवार वगळता तब्बल २४ सार्वजनिक सुट्ट्या असणार आहेत.
२६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन), १५ ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन) आणि २ ऑक्टोबर (महात्मा गांधी जयंती) या तीन राष्ट्रीय सुट्ट्या असून यांच्यासह विविध सणांच्या निमित्ताने बँक बंद असतील. २०२३ मधील प्रमुख बँक सुट्ट्यांची महिन्यानुसार यादी येथे पहा.
जानेवारी २०२३
२६ जानेवारी (प्रजासत्ताक दिन)
फेब्रुवारी २०२३
१८ फेब्रुवारी – महाशिवरात्री
१९ फेब्रुवारी- छत्रपती शिवाजी महाराज जयंती (तारखेनुसार)
मार्च २०२३
७ मार्च – होळी
२२ मार्च – गुढीपाडवा
३० मार्च- रामनवमी
एप्रिल २०२३
४ एप्रिल- महावीर जयंती
७ एप्रिल- गुड फ्रायडे
१४ एप्रिल- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
२२ एप्रिल- रमझान ईद
मे २०२३
१ मे- महाराष्ट्र दिन
५ मे- बुद्ध पौर्णिमा
जून २०२३
२८ जून- बकरी ईद
जुलै २०२३
२९ जुलै- मोहरम
ऑगस्ट २०२३
१५ ऑगस्ट- स्वातंत्र्य दिन
१६ ऑगस्ट- पारशी नववर्ष
सप्टेंबर २०२३
१९ सप्टेंबर- गणेश चतुर्थी
ऑक्टोबर २०२३
२ ऑक्टोबर- महात्मा गांधी जयंती
२४ ऑक्टोबर- दसरा
नोव्हेंबर २०२३
१२ नोव्हेंबर- लक्ष्मी पूजन
१४ नोव्हेंबर- दिवाळी पाडवा
२७ नोव्हेंबर- गुरुनानक जयंती
डिसेंबर २०२३
२५ डिसेंबर- नाताळ
२०२३ च्या नववर्षातील सुट्ट्यांचे हे पत्रक आजच सेव्ह करून ठेवा जेणेकरून तुमच्या बँकेच्या व्यवहारात प्रत्यक्ष कोणताही अडथळा येणार नाही. या दिवशी बँकांचे ऑनलाईन व्यवहार मात्र सुरु असणार आहेत. तुम्हाला सुट्ट्या बघून फिरायला जाण्याचे प्लॅन करायचे असल्यास त्यासाठीही हे पत्रक नक्की कामी येईल.