सोलापुरातील करमाळा या ठिकाणी असलेल्या ‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या इमारतीचा स्लॅब कोसळला. हा स्लॅब कोसळल्याने ढिगाऱ्याखाली २० ते २५ कर्मचाऱी अडकल्याची भीती व्यक्त होते आहे. आत्तापर्यंत ६ जणांना वाचवण्यात यश आलं असून त्यांच्यावर कुटिर रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत. ढिगाऱ्याखाली २० ते २५ कर्मचारी अडकल्याची भीती व्यक्त होते आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी मदत आणि बचावकार्य सुरु केलं आहे.

या ठिकाणी लोकांचीही गर्दी मोठ्या प्रमाणावर झाली आहे. जखमींमध्ये आपले नातेवाईक तर नाहीत ना? याची खात्री करण्यासाठी लोक जमा झाले आहेत. आता ज्यांना वाचवण्यात येतं आहे त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी मदत आणि बचाव कार्य करणाऱ्यांना या गर्दीतून वाट काढावी लागते आहे.

Story img Loader