मी व माझ्या कुटुंबाविरोधत इतर कुटुंबिय प्रचार करतील, अशी शक्यता अजित पवार यांनी बारामती येथे बोलताना व्यक्त केली होती. त्या टिकेला आता खासदार सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिले आहे. “आमच्या कुटुंबाला राजकारणात कशाला खेचता?” असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. “सर्वचजण माझे कुटुंबिय आहेत. त्यांचे (अजित पवार) कुटुंबदेखील माझे कुटुंब आहे. असे वेगवेगळे कुटुंब दाखवता येत नाहीत. “रिश्ते दिल से बनते है यार, ऐसा नही होता”, असे हिंदीतील वाक्यही सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी वापरले.

Photo : नणंद आणि भावजय यांच्यात लढत? सुप्रिया सुळेंना भिडणाऱ्या सुनेत्रा पवार कोण आहेत?

Sharad Pawar and Amit Shah
Sharad Pawar : शरद पवारांचं अमित शाह यांना उत्तर, “१९७८ मध्ये मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो तेव्हा हे गृहस्थ…..”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal
Rahul Gandhi Vs Arvind Kejriwal : “केजरीवाल आणि पंतप्रधान मोदी यांच्यात फरक नाही, दोघेही…”; राहुल गांधींच्या टीकेला आप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
hasan mushrif ajit pawar (1)
“…तर अजित पवार धनंजय मुंडेंना सोडणार नाहीत”, हसन मुश्रीफांचं वक्तव्य
Supriya sule and pankaja Munde
Supriya Sule : “बीडची बदनामी केली जातेय”, पंकजा मुंडेंच्या टीकेवर सुप्रिया सुळेंचा पलटवार; म्हणाल्या, “कोणताही जिल्हा…”
Devendra Fadnavis and Sharad Pawar (1)
Sharad Pawar : बीडप्रकरणी शरद पवारांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन; म्हणाले, “राजकारणात मतभेद असतील-नसतील, पण…”
Devendra Fadnavis and Divija Fadnavis
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांकडून लेक दिविजाचं तोंडभरून कौतुक; हुशारीचं वर्णन करताना म्हणाले, “तिच्यातील प्रगल्भता…”
Image Of Jwala Gutta And L&T Chairman
“कर्मचाऱ्यांनी पत्नीकडे का पाहू नये?”, ज्वाला गुट्टाचा संताप; ‘L&T’च्या अध्यक्षांविरोधात वाढली टीकेची धार

हा भातुकलीचा खेळ नाही

“राजकारण हा भातुकलीचा खेळ नाही. यात नाती महत्त्वाची नसतात, तर जबाबदारी महत्त्वाची असते. नाती ही प्रेमाची असतात. मी नाती आणि काम यात गल्लत करत नाही. माझी नाती एका जागेवर आणि काम दुसऱ्या जागेवर आहे. माझी नाती पवार, सुळे, भट आणि शिंदे या नावापुरती मर्यादित नाहीत. रक्ताची नसली तरी माझी मतदारसंघात प्रेमाची नाती अनेक आहेत. नाती माझ्यासाठी नेहमी महत्त्वाची आहेतच. पण माझे कामही तेवढेच महत्त्वाचे आहे. माझी एक विचारसरणी आहे, ज्यामध्ये मी लहानाची मोठी झाले. माझ्यासाठी ही लढाई वैयक्तिक नसून वैचारीक आहे. माझी लढाई वैयक्तिक कोणत्या व्यक्तीशी नसून माझी लढाई भाजपा आणि त्यांच्या चुकीच्या धोरणांविरोधात आहे. त्यांच्या आघाडीमध्ये जो कुणी त्या विचाराने काम करत असेल तर त्या विचारांशी माझी लढाई आहे”, असेही स्पष्टीकरण सुप्रिया सुळे यांनी दिले.

अजित पवारांचे बारामतीकरांना पुन्हा भावनिक आवाहन; म्हणाले, “सख्ख्या भावाच्या घरी जन्मलो..”

पंतप्रधानच सेल्फी मोहिमेला प्रोत्साहन देतात

सेल्फी काढून कामं होत नाहीत, अशी टीका अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केली होती. या टीकेलाही सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिले. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील शिक्षण खात्याने एक शासन निर्णय काढला होता, त्यात प्रत्येक महाविद्यालयात मोदींचा फोटो लावून सर्व विद्यार्थ्यांना त्यासोबत सेल्फी काढण्यास सांगितले होते. दुसरीकडे स्मृती इराणी यांना एक कोटी महिलांसह सेल्फी काढण्याचे लक्ष्य देण्यात आले होते, असेही बातम्यात मी वाचले. तसेच स्टेशन, महाविद्यालय सगळीकडे मोदींच्या फोटोचे सेल्फी पॉईंट उभारण्याचे निर्देश सरकारतर्फे देण्यात आले आहेत. दिल्ली विमानतळावर प्रवेश केल्या केल्या पंतप्रधान मोदींचा सेल्फी पॉईंट आहे. सेल्फी प्रमोशन हे आम्ही करत नाहीत, तर देशाचे पंतप्रधान करत आहेत. देशाचे पंतप्रधानच जर सेल्फीला महत्त्व देत असतील तर आम्ही केले तर चूक काय?”, असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.

अजित पवारांचे ‘पवार कुटुंबा’वर बोलताना मोठे विधान; म्हणाले, “आमच्या घरातील…

देशाची संसद भाषणं करण्यासाठीच असते

“देशाची संसद ही भाषणं करण्यासाठीच असते. संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इतर अनेक दिग्गज नेत्यांनी संसदेत भाषणं करूनच या देशाच्या विकासाची दिशा ठरविली होती. लोक आम्हाला निवडून देतात, ते संसदेत भाषणं करण्यासाठीच. मागच्या आठवड्यात सत्ताधारी बाकावरून श्वेतपत्रिकेवर एक आदर्श भाषण केलं गेलं आणि आठवड्याभरातच त्याचे आदर्श परिणाम पाहायला मिळाले. त्यामुळे संसदेच्या भाषणाची ताकद किती आहे ते बघा?” असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना लगावला. भाषणं ठोकून मतदारसंघातील कामं होत नाही, अशीही टीका अजित पवार यांनी केली होती. या टीकेला सुप्रिया सुळेंनी प्रत्युत्तर दिले.

Story img Loader