Highlights Baramati Election Result NCP leader Ajit Pawar leading in Baramati against nephew Yugendra Pawar: बारामती विधानसभा मतदारसंघात लोकसभेनंतर पवार कुटुंब पुन्हा एकदा आमनेसामने आले आहे. लोकसभा निवडणुकीत बहीण सुप्रिया सुळेविरोधात अजित पवारांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडणुकीत उतरवले होते. आता विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्याविरोधात त्यांचेच सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांना उतरविले गेले. बारामती हा गेले कित्येक वर्ष पवार कुटुंबाचा गड राहिला आहे. मात्र २०२२ साली अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्षातील आमदार घेऊन महायुतीत सामील झाल्यानंतर बारामतीतही त्याचे पडसाद पाहायला मिळाले. आता विधानसभा निकालानंतर ‘केंद्रात ताई, राज्यात दादा’ हेच सूत्र बारामतीकर कायम ठेवतात का? हे पाहावे लागेल. अजित पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघात मोठी आघाडी घेतली आहे.
Baramati Election Results 2024, NCP Sharadchandra Pawar vs NCP Ajit Pawar Vote Counting Live | बारामती विधानसभा निवडणूक निकाल २०२४ लाइव्ह अपडेट्स| अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार मतमोजणी लाइव्ह अपडेट्स
Yugendra Pawar Baramati Assembly Election: अजित पवार यांच्याकडून पराभव झाल्यानंतर युगेंद्र पवार यांची पहिली पोस्ट
बारामती विधानसभा मतदारसंघात युगेंद्र पवार यांचा पराभव झाल्यानंतर त्यांनी मतदारांना आवाहन करणारी एक पोस्ट लिहिली आहे. यापुढे जनतेच्या सेवेसाठी काम करत राहिल, असे ते म्हणाले.
https://twitter.com/yugendraspeaks/status/1860328339615154422
Ajit Pawar Win Baramati: अजित पवारांचा मोठा विजय, लोकसभेचा वचपा काढत पुतण्याचा केला पराभव
अजित पवार यांनी बारामती मतदारसंघात अखेर मोठा विजय मिळविला आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढत त्यांनी पुतण्या युगेंद्र पवारचा पराभव केला.
Baramati election result: अजित पवारांच्या विजयावर सुनेत्रा पवार यांची प्रतिक्रिया
अजित पवार यांचा विजय होत आहे. याप्रसंगी सुनेत्रा पवार यांनी बारामतीकरांचे आभार मानले. अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत, अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे. पण शेवटी हा आकड्याचा खेळ आहे.
Baramati Election Result 2024 : अजित पवारांची सूचक पोस्ट; म्हणाले, महाराष्ट्राने गुलाबी रंग निवडला
महायुतीला स्पष्ट बहुमत आणि अजित पवारांचे विक्रमी आमदार निवडून आल्यानंतर अजित पवार यांनी एक्सवर आभार माननारी पोस्ट केली आहे. 'महाराष्ट्र चूज पिंक' अशी पोस्ट अजित पवार यांनी टाकली.
https://twitter.com/AjitPawarSpeaks/status/1860211799163109784
Baramati Election Result 2024 : बारामतीत निकालाआधीच उधळला विजयाचा गुलाल; अजित पवार की शरद पवार कोणत्या गटाला इतका आत्मविश्वास; पाहा Video
Baramati Election Result Updates Ajit Pawar vs Sharad Pawar : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे आता सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. या निवडणुकीच्या मतमोजणीच्या सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे पुतणे व राष्ट्रवादी (शरद पवार)चे उमेदवार युगेंद्र पवार यांच्याविरोधात आघाडी घेतली आहे. अजित पवार महाराष्ट्र विधानसभेची ही निवडणूक बारामती मतदारसंघातून लढवत आहेत आणि पवार कुटुंबीयांच्या बालेकिल्ल्यात आपल्या पुतण्याविरुद्ध विजय मिळवून आठव्यांदा विजयी होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. मतमोजणीतील अजित पवारांनी घेतलेली आघाडी पाहता, आता बारामतीत त्यांच्या समर्थकांनी निकालाआधीच विजयाचा गुलाल उधळला आहे. (वाचा सविस्तर बातमी)
Baramati Election Results 2024: अजित पवारांची निर्णायक आघाडी
अजित पवार यांनी बारामती विधानसभा मतदारसंघात जोरदार मुसंडी मारली आहे. आठव्या फेरीअखेर अजित पवारांनी ७३,०२५ मते मिळवली आहेत. त्यांच्याकडे ३८ हजारांची आघाडी आहे.
Baramati Election Results 2024: बारामतीमध्ये अजित पवारांच्या विजयाचे सेलिब्रेशन सुरू झाले आहे
बारामती विधानसभा मतदारसंघात अजित पवार यांनी मोठी आघाडी घेतली आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली आहे.
Baramati Assembly Election Result 2024 Live Updates: बारामतीकरांनी निकाल दिला, अजित पवारच ठरणार कारभारी
अजित पवार यांनी आता निर्णायक आघाडी घेतली आहे. युगेंद्र पवार हे पिछाडीवर आहेत.
Baramati Ajit Pawar Election Result: अजित पवारांनी घेतली मोठी आघाडी, युगेंद्र पवार पिछाडीवर
बारामतीमध्ये तिसऱ्या फेरीनंतर अजित पवारांनी मोठी आघाडी घेतली आहे. अजित पवारांना
९२०६ तर युगेंद्र पवार यांना ५००७ एवढी मते मिळाली आहेत.
Ajit Pawar Election Result: अजित पवारांची आघाडी कायम
तिसऱ्या फेरीनंतर युगेंद्र पवार ११ हजार मतांनी आघाडीवर आहेत.
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल कुठे पाहू शकाल? जाणून घ्या
महाराष्ट्र निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना आहे. ही निवडणूक खूप चुरशीची झाली आहे. निवडणुकीचा निकाल पाहा एका क्लिकवर
Baramati Assembly Election Result 2024 Live: पोस्टल मतदानात युगेंद्र पवार यांची बाजी, काकावर केली मात
बारामती विधानसभा मतदारसंघात पुतणे युगेंद्र पवार हे पोस्टल मतदानात आघाडीवर आहेत. त्यामुळे अजित पवारांना धक्का मिळाल्याचे बोलले जात आहे. ईव्हीएम यंत्राची मतमोजणी सुरू झाल्यानंतर कदाचित हे चित्र बदलू शकते.
Baramati Election Results Live: बारामतीत युगेंद्र पवार आघाडीवर, पहिल्या फेरीतील मतमोजणीला सुरुवात
मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पहिल्या फेरीतील मतमोजणीचे कल समोर आले असून बारामतीत युगेंद्र पवार आघाडीवर आहेत.
Baramati Election Results Live: अवघ्या पाच मिनिटांत राज्याच्या २८८ मतदारसंघाच्या मतमोजणीला सुरुवात
अवघ्या पाच मिनिटांत राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात मतमोजणीला सुरुवात होणार आहे. आधी पोस्टल मतदानाची मोजणी होईल. त्यानंतर ईव्हीएम यंत्रातील मतमोजणीला सुरुवात होईल.
Baramati Election Results 2024 Live: दोन्ही उमेदवार तगडे आहेत, पण जिंकणार तर...
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार यांनी बारामतीमध्ये कोण निवडून येणार, याबाबत माध्यमांशी चर्चा केली. बारामतीमधील दोन्ही उमेदवार तगडे आहेत, पण बारामतीकरांनी त्यांचा उमेदवार निवडलेला आहे. लवकरच बारामतीकरांच्या मनात कोण आहे? हे दिसेल, असे ते म्हणाले.
Baramati Election Results 2024 Live: बारामतीमध्ये मतमोजणी केंद्राबाहेर चोख बंदोबस्त लावण्यात आला
पुणे ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक सुदर्शन राठोड यांनी बारामतीमध्ये मतमोजणीच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. तसेच काय बंदोबस्त लावला आहे, याची माहिती दिली.
Baramati Election Results 2024 Live: आजची सकाळ आपली, गुलालही आपलाच; रोहित पवार यांची सूचक पोस्ट
आमदार रोहित पवार आणि अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर एक सूचक पोस्ट टाकली आहे. त्यात म्हटले आहे की, आजची सकाळ आपली आणि गुलालही आपलाच...
Baramati Election Results 2024 Live: सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार
आज सकाळी ८ वाजता बारामती विधानसभा मतदारसंघात मतमोजणीला सुरुवात सुरुवात होणार आहे. मतमोजणी केंद्राबाहेर आता कार्यकर्ते जमू लागले आहेत.
Baramati Vidhan Sabha Election Results Live: अवघ्या काही तासात ठरणार बारामतीचा आमदार
थोड्याच वेळात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू होणार आहे. बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? हे थोड्याच वेळात कळेल.
Baramati Vidhan Sabha Election Results Live Updates: बारामती पवार कुटुंबियांचा इतिहास काय?
बारामतीचा गेल्या ५८ वर्षांपासून पवार कुटुंबाशीच निवडणुकीच्या राजकारणासंदर्भात संबंध आला आहे. १९६७ साली शरद पवार इथून निवडून आले होते. १९६७ ते १९९१ सालापर्यंत शरद पवारच इथून आमदार होते. त्यानंतर अजित पवार बारामतीमधून निवडून येऊ लागले. आता जवळपास ३५ वर्षांनंतर पुन्हा एकदा एका काकाकडून एका पुतण्याकडे आमदारकी जाण्याची चर्चा सुरू झाली होती. फक्त १९९१ साली ती पुतण्याकडे स्वत:हून सोपवलेली आमदारकी होती तर आता आमदारकीसाठी काका विरुद्ध पुतण्या असाच सामना उभा राहिला आहे.
Ajit Pawar vs Yugendra Pawar Live Updates: एक्झिट पोल्समध्ये कौल कुणाला? अजित पवार की युगेंद्र पवार
इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, बारामतीकरांची पसंती अजित पवारांनाच असल्याचं दिसून येत आहे. “दादाच येईल, पण घासून येईल. मी तुतारीला मत दिलं आहे. मी कायम शरद पवारांसोबत राहिलो आहे. पण तरीही मला वाटतं अजित पवारच यंदा जिंकतील. पण त्यांचं विजय मोठ्या फरकाने नसून काँटे की टक्कर होईल”, अशी प्रतिक्रिया श्रीमंत सुभाससिंग महाराज हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधून मतदान करून बाहेर पडलेल्या एका मतदारानं इंडियन एक्स्प्रेसला दिली.
Baramati Vote Counting Live Updates: बारामती विधानसभेच्या रिंगणात किती उमेदवार?
बारामती विधानसभेची मतमोजणी प्रक्रिया वखार महामंडळ गोडाऊन येथे होणार आहे. त्यासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. बारामती लोकसभेसाठी एकूण २३ उमेदवार रिंगणात आहेत. मतमोजणीच्या एकूण २० फेऱ्या होणार आहेत.
Baramati Assembly Election Results 2024 Live Updates: मतदानाचा वाढलेला टक्का कुणाच्या पारड्यात जाणार?
बारामतीमध्ये वाढलेले तीन टक्के मतदान कुणाच्या पारड्यात जाणार अशी चर्चा आहे. शेवटच्या दिवसापर्यंत अजित पवार आणि युगेंद्र पवार यांच्यात अटीतटीचा सामना पाहायला मिळाला.
Baramati Constituency Vidhan Sabha Election Result Live: युगेंद्र पवार कोण आहे?
Baramati Assembly Election Result 2024 Live: बारामतीमध्ये किती मतदार मतदानासाठी उतरले?
बारामती विधानसभेत १ लाख ४२ हजार ९३२ पुरुष आणि १ लाख २९ हजार ४५९ महिला मतदारांनी मतदान केले. एकूण २ लाख ७२ हजार ४०२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. २०१९ च्या तुलनेत यंदा बारामतीमध्ये जवळपास तीन टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद झाली.
Baramati Election Result Live: बारामतीमध्ये ७१ टक्के मतदानाची नोंद
बारामती विधानसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत ७१.२७ टक्के मतदानाची नोंद झाली, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गणेश शिंदे यांनी दिली.