Baramati Election Result: Ajit Pawar vs Yugendra Pawar Vote Counting Live Updates: बारामती विधानसभा मतदारसंघात लोकसभेनंतर पवार कुटुंब पुन्हा एकदा आमनेसामने आले आहे. लोकसभा निवडणुकीत बहीण सुप्रिया सुळेविरोधात अजित पवारांनी पत्नी सुनेत्रा पवार यांना निवडणुकीत उतरवले होते. आता विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्याविरोधात त्यांचेच सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांना उतरविण्यात आले आहे. बारामती हा गेले कित्येक वर्ष पवार कुटुंबाचा गड राहिला आहे. मात्र २०२२ साली अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्षातील आमदार घेऊन महायुतीत सामील झाल्यानंतर बारामतीतही त्याचे पडसाद पाहायला मिळाले. आता विधानसभा निकालानंतर ‘केंद्रात ताई, राज्यात दादा’ हेच सूत्र बारामतीकर कायम ठेवतात का? हे पाहावे लागेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

Live Updates

Baramati Election Results 2024, NCP Sharadchandra Pawar vs NCP Ajit Pawar Vote Counting Live | बारामती विधानसभा निवडणूक निकाल २०२४ लाइव्ह अपडेट्स| अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार मतमोजणी लाइव्ह अपडेट्स

03:59 (IST) 23 Nov 2024

Baramati Vote Counting Live Updates: बारामती विधानसभेच्या रिंगणात किती उमेदवार?

बारामती विधानसभेची मतमोजणी प्रक्रिया वखार महामंडळ गोडाऊन येथे होणार आहे. त्यासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे. बारामती लोकसभेसाठी एकूण २३ उमेदवार रिंगणात आहेत. मतमोजणीच्या एकूण २० फेऱ्या होणार आहेत.

02:43 (IST) 23 Nov 2024

Baramati Assembly Election Results 2024 Live Updates: मतदानाचा वाढलेला टक्का कुणाच्या पारड्यात जाणार?

बारामतीमध्ये वाढलेले तीन टक्के मतदान कुणाच्या पारड्यात जाणार अशी चर्चा आहे. शेवटच्या दिवसापर्यंत अजित पवार आणि युगेंद्र पवार यांच्यात अटीतटीचा सामना पाहायला मिळाला.

01:49 (IST) 23 Nov 2024

Baramati Constituency Vidhan Sabha Election Result Live: युगेंद्र पवार कोण आहे?

अजित पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवत असलेला युगेंद्र पवार हा नवखा उमेदवार आहे. अजित पवार यांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार यांचा तो मुलगा आहे. युगेंद्र आजवर व्यवसाय आणि शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून बारामतीशी जोडला गेला होता. आता तो थेट काकांच्या विरोधात मैदानात उतरला आहे.

00:40 (IST) 23 Nov 2024

Baramati Assembly Election Result 2024 Live: बारामतीमध्ये किती मतदार मतदानासाठी उतरले?

बारामती विधानसभेत १ लाख ४२ हजार ९३२ पुरुष आणि १ लाख २९ हजार ४५९ महिला मतदारांनी मतदान केले. एकूण २ लाख ७२ हजार ४०२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. २०१९ च्या तुलनेत यंदा बारामतीमध्ये जवळपास तीन टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद झाली.

23:40 (IST) 22 Nov 2024

Baramati Election Result Live: बारामतीमध्ये ७१ टक्के मतदानाची नोंद

बारामती विधानसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत ७१.२७ टक्के मतदानाची नोंद झाली, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी गणेश शिंदे यांनी दिली.

बारामती विधानसभेतील मतदारांचा कौल कुणाला? अजित पवार मतदारसंघ राखणार की युगेंद्र पवार बाजी मारणार?