Who is Leading Baramati Exit Polls: लोकसभा निवडणुकांपासून महाराष्ट्रात चालू झालेला रणसंग्राम बुधवारी थंडावला. राज्यातल्या २८८ मतदारसंघांमध्ये मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. आता २३ नोव्हेंबर रोजी येणाऱ्या निकालांकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. सर्व उमेदवार व पर्यायाने महाराष्ट्रातील व राष्ट्रीय पातळीवरील काही पक्षांचं भवितव्य इव्हीएममध्ये कैद झालं आहे. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लागलीच एग्झिट पोलचे अंदाजही समोर आले. यामध्ये आलेले कल हे महायुतीसाठी दिलासादायक तर महाविकास आघाडीसाठी चिंता वाढवणारे ठरू शकतात. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वाधिक चर्चेत आलेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

राज्यात ३० वर्षांत सर्वाधिक मतदान

गेल्या तीस वर्षांत राज्यात सर्वाधिक मतदान यावेळी झाल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे. राज्यात ६५ टक्क्यांहून जास्त मतदान झाल्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा कल नेमका कुणाच्या बाजूला झुकणार? वाढलेलं मतदान कुणासाठी फायदेशीर ठरणार? याची उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यामुळेच एग्झिट पोलची सध्या जोरदार चर्चा असून राज्यातील बहुतांश एग्झिट पोल्समध्ये महायुतीलाच पुन्हा सत्ता मिळणार असल्याचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत.

Sharad pawar on ajit pawar
Sharad Pawar : “नाद करायचा नाय….”, भरसभेत शरद पवारांचा अजित पवारांना थेट इशारा; म्हणाले, “एकदा रस्ता चुकला की…”
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
bjp slogans batenge to katenge ek hai to safe hai in maharashtra assembly elections
अग्रलेख : घोषणांच्या म्हशी…
murbad constituency kisan kathore subhash pawar, agri and kunbi
मुरबाडच्या ‘कुणबी’ लढतीत आगरी अस्मिताही महत्वाची
Sanjay Raut and Mallikarjun Kharge
खरगेंच्या मुखी समर्थ रामदासांचा श्लोक, पण संजय राऊत निरुत्तर; जाहीरनामा प्रसिद्ध करताना नेमकं काय घडलं?
Ajit Pawar on Udyanraje Bhosale
Ajit Pawar: ‘साताऱ्याला पिपाणीनं वाचवलं, नाहीतर…’, अजित पवारांच्या मिश्किल टिप्पणीनं भाजपाचीच कोंडी
Prashant Bamb BJP MLA
“मरेपर्यंत पस्तावशील, हे लोक तुला…”, भाजपा आमदाराची भर सभेत अरेरावी; प्रश्न विचारणाऱ्यांना कार्यकर्त्यांनी हुसकावलं
Ajit Pawar group Dilip Walse Patil Politics
Dilip Walse Patil : विधानसभेनंतर राजकीय समीकरणे बदलणार? अजित पवार गटाच्या नेत्याचं सूचक विधान; म्हणाले, “काही गणितं…”

आघाडीनिहाय एग्झिट पोलचे अंदाज

पोलमहायुतीमविआइतर
P-MARQ१३७ – १५११२६ ते १४६२ ते ८
People’s Pulse१७५ ते १९५८५ ते ११२७ ते १२
Matrize१५० ते १७०११० ते १३०८ ते १०
Lokshahi-Marathi Rudra१२८ ते १४२१२५ ते १४०१८ ते २३
JVC१०५ ते १२६६८ ते ९१८ ते १२
Chanakya१५२ ते १६०१३० ते १३८६ ते ८
Dainik Bhaskar१२५ ते १४०१३५ ते १५०२० ते २५
Electoral Edge११८१५०२०
Poll Diary१२२ ते १८६६९ ते १२११० ते २७

एकीकडे राज्यात महायुतीच्या बाजूने एग्झिट पोलचे अंदाज झुकले असताना बारामतीमध्ये काय परिस्थिती आहे? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. लोकसभा निवडणुकीला प्रस्थापित खासदार सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजित पवारांनी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उभं केलं होतं. त्यांचा पराभव झाला. आता प्रस्थापित आमदार खुद्द अजित पवारांच्या विरोधात शरद पवारांनी नातू युगेंद्र पवार यांना उभं केलं आहे. त्यामुळे आता निकाल काय लागणार? याची चर्चा सुरू झाली आहे. इंडियन एक्स्प्रेसनं बारामती मतदारसंघामध्ये घेतलेल्या आढाव्यात अजित पवारांनाच बारामतीकरांनी कौल दिल्याचं चित्र दिसून येत आहे.

“घासून येईल, पण दादाच येईल”

इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, बारामतीकरांची पसंती अजित पवारांनाच असल्याचं दिसून येत आहे. “दादाच येईल, पण घासून येईल. मी तुतारीला मत दिलं आहे. मी कायम शरद पवारांसोबत राहिलो आहे. पण तरीही मला वाटतं अजित पवारच यंदा जिंकतील. पण त्यांचं विजय मोठ्या फरकाने नसून काँटे की टक्कर होईल”, अशी प्रतिक्रिया श्रीमंत सुभाससिंग महाराज हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधून मतदान करून बाहेर पडलेल्या एका मतदारानं इंडियन एक्स्प्रेसला दिली.

Maharashtra Exit Poll Updates: लोकसभेला एग्झिट पोलचे अंदाज खोटे ठरले होते, विधानसभेला काय होणार? महायुती की मविआ?

तर सोनाली तावरे नावाच्या दुसऱ्या एका मतदार तरुणीनं मयुरेश प्रायमरी अँड हायर सेकंडरी स्कूल मतदान केंद्रातून बाहेर पडल्यावर सांगितलं की “आम्ही बारामती शहरात राहतो आणि अजित पवारांनी इथे केलेला विकास आम्ही पाहिला आहे. त्यामुळे मला वाटतं तेच जिंकतील”! आणखी एका मतदारसंघाबाहेर बसलेल्या काही मतदारांच्या घोळक्यानं मात्र ही निवडणूक म्हणजे काँटे की टक्कर असल्याचं मत व्यक्त केलं आहे. “कोण जिंकेल हे कोण सांगू शकेल? हा अटीतटीचा सामना आहे आणि यात कुणीही जिंकू शकतं”, असं त्यातल्या एकानं सांगितलं. तर दुसऱ्यानं लगेच “घड्याळच जिंकेल”, असं म्हणत आपलं मत दिलं.

बारामती आणि पवार कुटुंब!

बारामतीचा गेल्या ५८ वर्षांपासून पवार कुटुंबाशीच निवडणुकीच्या राजकारणासंदर्भात संबंध आला आहे. १९६७ साली शरद पवार इथून निवडून आले होते. १९६७ ते १९९१ सालापर्यंत शरद पवारच इथून आमदार होते. त्यानंतर अजित पवार बारामतीमधून निवडून येऊ लागले. आता जवळपास ३५ वर्षांनंतर पुन्हा एकदा एका काकाकडून एका पुतण्याकडे आमदारकी जाण्याची चर्चा सुरू झाली होती. फक्त १९९१ साली ती पुतण्याकडे स्वत:हून सोपवलेली आमदारकी होती तर आता आमदारकीसाठी काका विरुद्ध पुतण्या असाच सामना उभा राहिला आहे.