लोकसभेची निवडणूक डोळय़ांसमोर ठेवून स्वत:ला प्रसिद्धी मिळावी या उद्देशाने माझ्या विरुद्ध शेतकरी संघटनेचे नेते राजेंद्र गड्डय़ान्नावार माझ्यावर बिनबुडाचे आरोप करीत आहेत. त्यामुळे माझी बदनामी होत आहे. या अब्रुनुकसानीपोटी त्यांनी मला एक कोटी रुपये भरपाई द्यावी, असा दावा कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांनी येथील दिवाणी न्यायालयात दाखल केला.
कामगारमंत्री मुश्रीफ यांच्या वतीने अॅड. शिवाजीराव राणे, अॅड. अजित मोहिते, अॅड. जयदीप रासमे, अॅड. प्रशांत पाटील, अॅड. अॅलन बारदोस्कर यांनी हा दावा न्यायालयात दाखल केला. यासाठी मुश्रीफ यांनी १ लाख ४० हजार रुपयांचे मुद्रांक शुल्कही भरले.
मुश्रीफ यांनी दाखल केलेल्या दाव्यात म्हटले आहे, की गड्डय़ान्नावार हे स्वत:ला शेतकरी संघटनेचा नेता समजतात. लोकसभा निवडणूक कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता असल्याने त्यादृष्टीने गड्डय़ान्नावार हे स्वत:ला प्रसिद्धी मिळविण्यासाठी मुश्रीफ यांच्यावर वारंवार बेलगाम व बिनबुडाचे आरोप करीत आहेत.
शेतकरी संघटनेच्या नेत्यांचे बिनबुडाचे आरोप – मुश्रीफ
लोकसभेची निवडणूक डोळय़ांसमोर ठेवून स्वत:ला प्रसिद्धी मिळावी या उद्देशाने माझ्या विरुद्ध शेतकरी संघटनेचे नेते राजेंद्र गड्डय़ान्नावार माझ्यावर बिनबुडाचे आरोप करीत आहेत.
First published on: 10-11-2013 at 12:15 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baseless charges of farmers association leaders mushrif