लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

अलिबाग : दिवाळी निमित्त लोक फिरण्यासाठी घराबाहेर पडले आहेत. मुंबई पुण्यापासून जवळ असलेले रायगडचे किनारे सलग सुट्यांमुळे पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत. अलिबागसह मुरुड, काशीद, नागाव, दिवेआगर, श्रीवर्धनच्या किनाऱ्यांवर पर्यटकांची तोबा गर्दी दिसून येत आहे.

Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Controversial statement of MP Dhananjay Mahadik on Ladki Bahin Yojana
लाडकी बहीण योजनेवरून खासदार धनंजय महाडिक यांचे वादग्रस्त विधान; खासदार प्रणिती शिंदे, आमदार सतेज पाटील यांचे टीकास्त्र
1115 crore IPO of Zinka Logistics from November 13 print
झिंका लॉजिस्टिक्सचा १,११५ कोटींचा ‘आयपीओ’ १३ नोव्हेंबरपासून
Gaitonde
कलाकारण: बाजारप्रणीत इतिहासाच्या पलीकडले गायतोंडे
Two brothers from the village farmed saffron together Earn lakhs of rupees
Success Story: खेड्यातील दोन भावांनी मिळून केली केशरची शेती; वर्षाला कमावतात लाखो रुपये
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड
kharghar to turbhe link road work will start after maharashtra assembly election 2024
खारघर तूर्भे लिंकरोडचे काम निवडणूकीनंतर सूरु होणार

सलग चार दिवस सुटटी मिळाल्‍याने लोकांनी फिरायला जाण्‍याचा बेत आखला. त्‍यासाठी रायगडच्‍या किनाऱ्यांना मोठी पसंती दिल्‍याचे पहायला मिळते. मुंबईहून जवळ असलेल्या तसेच मिनी गोवा म्हणून पर्यटकांची प्रमुख पसंती असलेल्या अलिबाग व मुरुडकडे वेळेची व इंधनाची बचत करत मांडवामार्गे जलप्रवासाने पर्यटक दाखल झाले आहेत. सागरी सफरीचा आनंद घेत इथं आलेले पर्यटक मनसोक्त हुंदडत इथल्‍या निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेत आहेत. समुद्र स्नानाबरोबरच एटिव्ही राईड, जेट स्की, बनाना राईड यासारख्या वेगवेगळ्या वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेत आहेत. ताज्या मासळी वर ताव मारत आहेत. उंट सवारी घोडा गाडी यामुळे बच्चेकंपनीही खुश आहे.

आणखी वाचा-अलिबाग : बँकेचा व्यवस्थापकच निघाला लबाड, एसबीआयच्या श्रीबाग शाखेच्‍या फसवणूकीत मॅनेजर सामील

या निमित्ताने रायगडच्या सागरी पर्यटन हंगामाला सुरुवात झाली आहे. पर्यटकांच्या आगमनाने व्यावसायिक देखील खुश आहेत. इथल्‍या हॉटेल व्‍यावसायिकांबरोबरच घरगुती कॉटेजेस, छोटेमोठे विक्रेते यांना चांगला व्‍यवसाय उपलब्‍ध झाला आहे. पर्यटकांची ही रेलचेल सुट्या संपेपर्यंत अशीच कायम राहणार आहे.