बाजार समितीचे सभापती रामेश्वर िशदे यांनी समितीच्या संचालकाच्या मुलास बुधवारी बदडून काढले. त्याचे तीव्र पडसाद गुरुवारी उमटले. हा युवक पोलिसात फिर्याद देण्यास जात असल्याचे लक्षात येताच सभापतींनी कान पकडून घडल्या प्रकाराबाबत सर्वासमक्ष माफी मागितली!
बाजार समितीच्या शेतकरी निवासात बुधवारी बंडू मुटकुळे या युवकास िशदे यांनी बोलावून घेतले. समितीच्या हिशेबाबाबत चर्चा करायची असल्याचे त्याला सांगितले होते. मात्र, तेथे गेल्यानंतर त्याला चक्क दरडावणीच्या सुरात थेट पैशाची मागणी केली. त्यामुळे बंडूला राग अनावर झाला. त्याने माझे वडील िलबाजी मुटकुळे संचालक आहेत, त्यांच्याशीच बोला, असे सुनावले. परंतु यानंतर वाद मिटण्याऐवजी वाढत गेला. िशदे यांनी थेट चपलेनेच बंडूचा गाल लाल केला. आजूबाजूला असलेल्या मंडळींनी यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघेही ऐकत नव्हते. दोघांत चांगलीच हाणामारी व झटापट झाली.
हा प्रकार घडत असताना शेतकरी निवासाच्या बाजूलाच आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी डेरा टाकला होता. हे प्रकरण त्यांच्या कानावर गेले. मात्र, त्यांनी मौन बाळगले. गुरुवारी बंडू मुटकुळे यांच्या बाजूने सर्व समाज उभा राहिला. अनेकांनी िशदे यांच्या कृत्यावर पडदा टाकू नये, अशी भूमिका घेत आमदारांचा दरबार गाठला. मात्र, आमदारांनी िशदे यांच्यासाठी सर्वाची माफी मागितली. परंतु त्यावरही कार्यकत्रे ऐकायला तयार नव्हते. िशदे यांच्या अतिरेकी वागण्याचा उद्या तुम्हालाही फटका बसेल, असा सूचक इशाराही अनेकांनी दिला. मात्र, एवढे बोल ऐकूनही मुटकुळे यांनी िशदे यांना माफी मागायला सांगून प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
हा सगळा प्रकार ज्या शेतकरी निवासात घडला, त्याचा गरवापर गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. जिल्हा उपनिबंधकांनाही हा गरवापर थांबवता आला नाही. पुढाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करणेच सोडून दिले आहे. उलट तेथे खासगी वास्तव्य करण्याचा प्रकार खुलेआम केला जातो. विद्यमान सभापतींच्या भावानेच काही काळ तेथे शिक्षण संस्था चालवली. आताही इंदिरा सहकारी साखर कारखान्याच्या नावाखाली खासगी वास्तव्य सुरू आहे. शेतकऱ्यांना या वास्तूची गरज नसेल, तर लिलाव पद्धतीने भाडेतत्त्वावर शेतकरी निवास देण्याचे धाडस दाखविले जाणार आहे काय? हा खरा प्रश्न आहे. आमदार महोदयांनी झालेले वाद मिटविण्यापेक्षा वादाचे कारण ठरणाऱ्या शेतकरी निवासाच्या हिताचा विचार करणे गरजेचे असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.
आधी हाणले जोडे, मग कानाला खडे!
बाजार समितीचे सभापती रामेश्वर िशदे यांनी समितीच्या संचालकाच्या मुलास बुधवारी बदडून काढले. त्याचे तीव्र पडसाद गुरुवारी उमटले. हा युवक पोलिसात फिर्याद देण्यास जात असल्याचे लक्षात येताच सभापतींनी कान पकडून घडल्या प्रकाराबाबत सर्वासमक्ष माफी मागितली!
First published on: 05-06-2015 at 01:40 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Beating to son of director by market committee chairman