गोपीनाथ मुंडे हे खोटं बोल पण रेटून बोल, असे नेते आहेत. त्यांनीच जिल्हा बँक बुडवली, असा आरोप करीत मराठा व मुस्लीम समाजाला आम्हीच आरक्षण देऊ, अशी ग्वाही गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिली.
बीडमधील राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुरेश धस यांच्या प्रचारार्थ मंगळवारी पाटील यांची सभा झाली. उमेदवार धस, माजी आमदार उषा दराडे, सय्यद सलिम, अशोक डक, अशोक िहगे आदी उपस्थित होते. नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना ते सर्व जाती-धर्माला सोबत घेऊन जाऊ शकतात का? त्यांनी गुजरातचा काय विकास केला? असे सवाल त्यांनी केले. साक्षरतेत महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचे सांगून मराठा व मुस्लीम समाजाला आम्हीच आरक्षण देणार आहोत, असा दावाही त्यांनी केला.
मुंडे राजकारणातील खलनायक- पाटील
छत्रपती शिवाजीमहाराजांनी हर हर महादेव अशी घोषणा देत स्वराज्य निर्माण केले. परंतु मोदींनी ‘नमो-नमो’ची घोषणा दिली. यावरून मोदी हे स्वतला शिवरायांपेक्षा मोठे समजू लागले आहेत, अशी टीका पाटील यांनी िपपळनेर येथील सभेत केली. मुंडे यांनी जाहीरपणे आठ कोटींचा खर्च निवडणुकीत झाल्याचे सांगितले. हे आठ कोटी कोठून आले, याचे उत्तर मुंडेंनी द्यावे. जाती-पातीच्या राजकारणाला मुंडेंनी खतपाणी घातले. त्यामुळे मुंडे हे नायक नव्हे, तर राजकारणातील खलनायक आहेत, असा आरोपही पाटील यांनी केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा