Rajeshwar Chavan CID Inquiry : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण सीआयडीकडे देण्यात आले आहे. सीआयडीकडून याप्रकरणी आता चौकशी सुरू करण्यात आली असून आज रात्री साडेनऊ वाजेपर्यंत वाल्मिक कराडची पत्नी मंजिली कराड आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांची चौकशी करण्यात आली. चौकशी संपल्यानंतर राजेश्वर चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला.
“चौकशीचा भाग म्हणून जिल्हाध्यक्ष असल्याने त्यांनी मला चौकशीला बोलावलं होतं. मी जिल्हाध्यक्ष असल्याने सर्वचजण मला ओळखतात. मला विचारलं वाल्मिक कराडांना ओळखता का? राजकारण आणि समाजकारणात माझ्या ओळखी आहेत. मी जिल्हाध्यक्ष असल्याने सगळेच मला ओळखतात. विष्णू चाटे यांना आम्ही पक्षातून काढून टाकले आहे. मी २०२१ ला जिल्हाध्यक्ष झाल्यापासून ओळखत होतो. मी गावात होतो. मला चौकशीला बोलावलंय म्हणून मी चौकशीचा भाग म्हणून मी आलो. पोलीस चौकशीतून दूध का दूध पाणी का पाणी होईल”, असं राजेश्वर चव्हाण म्हणाले.
दरम्यान, राजेश्वर चव्हाण यांना पुन्हा उद्या चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.