Bajrang Sonwane On Dhananjay Munde : विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे सर्वच पक्षांच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. राज्यातील विविध मतदारसंघात नेत्यांनी दौऱ्याचा धडाका लावला आहे. एकीकडे महाविकास आघाडीचे नेते आणि दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांचे दौरे सुरु आहेत. सभा, मेळावे आणि आढावा बैठका घेत एक प्रकारे निवडणुकीचा प्रचार केला जात आहे. मात्र, असं असतानाच सत्ताधारी आणि विरोधी पक्षात आरोप-प्रत्यारोपही सुरु असल्याचे पाहायला मिळत आहेत. आता लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत केलेल्या एका विधानाची चर्चा रंगली आहे. “धनंजय मुंडे यांनी जर सरसकट ‘एनडीआरएफ’चे सर्व निकष मोडून तीन हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना मदत केली तर मी त्यांचा जाहीर सत्कार करेन”, असं खासदार बजरंग सोनवणे यांनी म्हटलं आहे.

खासदार बजरंग सोनवणे काय म्हणाले?

“बीड जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुकीसाठी एवढी उत्सुकता लोकांमध्ये आहे की, कधी निवडणूक जाहीर होती आणि ज्या प्रकारे लोकसभेचा निकाल दिला त्या पद्धतीने बीड जिल्ह्यातील विधानसभेचा निकाल आम्ही कधी देतो, यासाठी लोकांमध्ये उत्सुकता आहे. लोकसभेच्या निवडणुकीपासून आमच्याकडे अनेकांची गर्दी होत आहे. विधानसभेसाठी उमेदवारीची मागणी होत आहे. त्यावर पक्ष योग्य तो निर्णय घेईल, योग्य उमेदवार देईल. मात्र, अद्याप परळी विधानसभा मतदारसंघाबाबत आमच्या पक्षाचा कोणता निर्णय झालेला नाही”, असं बजरंग सोनवणे यांनी सांगितलं आहे.

sujay vikhe patil controversial Statement
Sujay Vikhe Patil : “आजपासून आचारसंहिता मोडतोय, जर कोणी…”, भाजपाच्या माजी खासदाराचं भरसभेत वादग्रस्त वक्तव्य!
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Former corporator of NCP Ajit Pawar group Nana Kate will contest as an independent
पिंपरी : चिंचवडमध्ये महायुतीत बंडखोरी, अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नाना काटे अपक्ष लढणार
Harshvardhan Patil On Ajit Pawar
Harshvardhan Patil : “मी पहाटे उठून कुठे जात नाही”, हर्षवर्धन पाटील यांची अजित पवारांवर खोचक टीका
Sujay Vikhe Patil Jayashree thorat Sangamner tension
Sangamner News: बाळासाहेब थोरातांच्या मुलीबद्दल बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; सुजय विखेंच्या सभेनंतर संगमनेरमध्ये तणाव
Senior Maharashtra minister Sudhir Mungantiwar
Sudhir Mungantiwar: लोकसभेनंतर भाजपाने रणनीतीत ‘हा’ महत्त्वाचा बदल केला, सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “RSS ने लोकसभेवेळी…”
Sharad pawar demand supreme court to freeze clock,
‘घड्याळ’ चिन्हाबाबत उद्या सुनावणी; शरद पवार गटाची बाजू ऐकण्याची तयारी
Rebellion to Mahayuti and Mahavikas Aghadi in Purandar
पुरंदरमध्ये महायुती, महाविकास आघाडीला बंडखोरीचे ग्रहण

हेही वाचा : Amol Kolhe : अजित पवार म्हणाले, “आता आपणच साहेब”, अमोल कोल्हे प्रत्युत्तर देत म्हणाले, “राज्यात दोनच साहेब, एक शरद पवार, दुसरे…”

“आमच्या जिल्ह्यावर निसर्गाची अवकृपा आहे. बीड जिल्ह्यात कधी पाऊस कमी असतो, तर कधी जास्त असतो. त्यामुळे कोणत्या परिस्थितीत शेती करावी हा देखील प्रश्न शेतकऱ्यांसमोर असतो. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण होती. राज्याचे कृषीमंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांसाठी काम करायला पाहिजे. धनंजय मुंडे यांनी बीडमधील एका गावातील दौऱ्यावेळी आश्वासन दिलं की, आम्ही ‘एनडीआरएफ’चे सर्व निकष मोडून सर्व शेतकऱ्यांना तीन हेक्टरपर्यंत सरसकट मदत करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यानंतर मी त्याच दिवशी सांगितलं की, पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जर सरसकट ‘एनडीआरएफ’चे सर्व निकष मोडून तीन हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना मदत केली, शेतकऱ्यांना अनुदान दिलं तर मी त्यांचा जाहीर सत्कार करणार आहे. बीड जिल्ह्याचा खासदार या नात्याने मी त्यांचा सत्कार करणार आहे”, असं बजरंग सोनवणे यांनी म्हटलं आहे.

रात्री का भेटी घ्याव्या लागत आहेत?

कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे यांची ७ जुलैच्या मध्यरात्री भेट घेतली होती. अंतरवली सराटी येथे जाऊन धनंजय मुंडे यांनी ही भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. तसेच या भेटीत महत्वाची चर्चाही झाल्याचं सांगितलं जातं. आता यावर बोलताना खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “धनंजय मुंडे यांना रात्री का भेटी घ्याव्या लागत आहेत? आता त्यांनी मनोज जरांगे यांची भेट का घेतली? हे मलाही समजलं नाही”, असं म्हणत त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.