Beed Sarpanch Accidental Death: बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जिल्ह्यासह राज्याचे राजकारण ढवळून निघाले असताना आता पुन्हा एकदा बीडमधील परळी तालुक्यातील आणखी एका सरपंचाचा अपघाती मृत्यू झाला आहे. परळीतील औष्णिक विद्युत प्रकल्पातून निघणाऱ्या राखेची अवैध वाहतूक आणि व्यवसाय होत असल्याचा आरोप भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी केला होता. याच राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परनं सौंदना गावचे विद्यमान सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत क्षीरसागर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

या अपघाताची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संबंधित टिप्पर चालकाला अटक करण्यात आली आहे. परळी तालुक्यातील मिरवट फाट्यावर सदर अपघात झाला. ही धडक इतकी भीषण होती की, क्षीरसागर यांच्या दुचाकीचा चुराडा झाला.

speeding water tanker hitting pedestrian on road took place in Kurla area on Saturday night
टँकरच्या धडकेत अनोळखी इसमाचा मृत्यू
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Rangava dies in accident in Sangamner news
संगमनेर मध्ये प्रथमच आढळला रानगवा, मात्र अज्ञात वाहनाच्या धडकेत त्याचा दुर्दैवी मृत्यू !
nashi four year old boy died after being found under car in premises of Hotel Express in
सांगोल्याजवळ वाहनांची धडक बसून दोन ऊसतोड मजुरांचा मृत्यू
pune koyta attack news
पुणे : बिबवेवाडीत तोडफोड करणाऱ्या आरोपीविरुद्ध आणखी एक गु्न्हा, तरुणावर कोयत्याने वार
Biker dies in car collision in Deccan Gymkhana area Pune news
डेक्कन जिमखाना भागात मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
pune crime news
पुणे : लग्नाची मागणी केल्याने बेदम मारहाणीत एकाचा मृत्यू, गोखलेनगर भागातील घटना
Pune Municipal Corporation contract employee stabbed to death over immoral relationship in Kothrud
कोथरूडमध्ये अनैतिक संबंधातून तरूणाचा खून, पोलिसांकडून संशयित आरोपी ताब्यात

हे वाचा >> वाल्मीक कराड: राखेच्या अवैध वाहतुकीतून दहशतीचा धुरळा!

मिळालेल्या माहितीनुसार, सौंदना गावचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर हे परळीच्या दिशेने जात होते. यावेळी शनिवारी (दि. ११ जानेवारी) रात्री साडे आठच्या सुमारास मिरवट फाट्यावर त्यांच्या दुचाकीला राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने धडक दिली. या धडकेत क्षीरसागर गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला.

अपघात की घातपात?

या घटनेवर भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया दिली असून हा अपघात की घातपात? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. ते म्हणाले, सरपंच क्षीरसागर यांचा जागेवरच मृत्यू झाला. हा घातपात होता का? याची चौकशी झाली पाहीजे. संतोष देशमुख प्रकरण झाल्यानंतरही राखेची अवैध वाहतूक करणारे टिप्पर बंद झालेले नाहीत. याला परळी पोलीस, औष्णिक विद्युत प्रकल्पाचे अधिकारी जबाबदार आहेत.

हे ही वाचा >> बाहुबलीचे बीड : बीडच्या दहशतीला पवनऊर्जेचे वारे!

बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली. गुन्हेगारांचे जिल्ह्यातील राजकीय नेतृत्वाशी असलेल्या लागेबांध्यांमुळेच बीड जिल्ह्यात गुन्हेगारी फोफावली असेही सांगितले जात आहे. बीडमधील राजकीय गुन्हेगारी बाबत माजी सनदी अधिकारी महेश झगडे यांनी आजच्या अंकात लिहिलेला बीडचे धडे!… हा लेख वाचा.

Story img Loader