Santosh Deshmukh Murder Case : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे. यादरम्यान महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सध्या सीआयडीकडून तपास सुरू असून आतापर्यंत दीडशेहून अधिक जाणांची या प्रकरणात चौकशी करण्यात आली आहे. या प्रकरणात दोन कोटींची खंडणी आणि हत्या या दोन्हींच्या संबंधाच्या अनुषंगाने तपास केला जात आहे. दरम्यान या प्रकरणात सीआयडीने आणखी तीन लोकांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. पण हे तीन जण कोण आहेत? याबद्दलची माहिती अद्याप उघड करण्यात आलेली नाही. या हत्या प्रकरणातील काही आरोपी अद्यापही फरार आहेत, त्यांचा देखील शोध सीआयडीकडून घेतला जात आहे. पीटीआयने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
तसेच या प्रकरणात आरोप होत असलेल्या वाल्मिक कराड हा पुणे येथे पोलिसांना शरण आला आहे. त्याच्याविरोधात खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला बीडमधील केजच्या न्यायालयाने १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
एसआयटीमध्ये कोणाचा समावेश?
दरम्यान या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाचे नेतृत्व आयपीएस बसवराज तेली, पोलीस उपमहानिरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा, सीआयडी पुणे यांच्याकडे असणार आहे. तर तेली यांच्या नेतृत्वाखालील या विशेष तपास पथकात पोलीस उपअधीक्षक अनिल गुजर, सहायक पोलीस निरीक्षक विजयसिंग जोनवाल, पोलीस उपनिरीक्षक महेश विघ्ने आणि पोलीस उपनिरीक्षक आनंद शंकर शिंदे यांच्यासह पोलीस सहायक पोलीस उपनिरीक्षक तुळशीराम जगताप, पोलिस हवालदार मनोज वाघ, पोलीस नाईक चंद्रकांत काळकुटे, पोलीस नाईक बाळासाहेब अहंकारे आणि पोलीस शिपाई संतोष गित्ते यांचा समावेश आहे.
हेही वाचा>> नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला १७,८०० जणांना वाहतूक पोलिसांचा दणका! ‘इतके’ लाख दंड वसूल…
वाल्मिक कराडला १४ दिवसांची पोलीस कोठडी
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात असलेल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे ९ डिसेंबर रोजी अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली होती. आरोपींनी एका पवनचक्की कंपनीकडे मागितलेली खंडणी देण्यास विरोध केल्याने त्यांची हत्या झाल्याचे सांगितले जाते. या प्रकरणात आरोप असलेला वाल्मिक कराड हा गेल्या काही दिवसांपासून फरार होता. वाल्मिक कराडनं मंगळवारी दुपारी अचानक एक व्हिडीओ जारी केला. या व्हिडीओमध्ये त्याच्यावरील सर्व आरोप त्याने फेटाळून लावले. तसेच, दाखल करण्यात आलेला खंडणीचा गुन्हाही अमान्य असल्याचं नमूद केलं. हा व्हिडीओ जारी केल्यानंतर पुढच्या तासाभरात तो पुण्यात सीआयडी पोलिसांच्या स्वाधीन झाला होता.
वाल्मिक कराड हा मंगळवारी दुपारी स्वत:हून पोलिसांच्या स्वाधीन झाला. त्यानंतर संध्याकाळी त्याला पुणे पोलिसांनी केज पोलिसांच्या हवाली केलं. तिथे त्याला संध्याकाळी उशीरा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयासमोर झालेल्या सुनावणीनंतर त्याला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
त