बंगलुरूमध्ये काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा धक्कादायक प्रकार काही समाजकंटकांनी केल्याचं समोर आलं होतं. या घटनेनंतर सर्वच स्तरातून तीव्र संताप व्यक्त झाला होता. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील विधानपरिषदेमध्ये या घटनेचा निषेध करणारा ठराव गुरुवारी आणला होता. या प्रकरणी वातावरण तापू लागलेलं असतानाच आता राज्याचे उच्च शिक्षण मंत्री आणि शिवसेना आमदार उदय सामंत यांनी या संपूर्ण प्रकरणावर स्पष्ट भूमिका मांडली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या काही तरुणांनी त्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.

बंगळुरूमध्ये घडलेल्या प्रकाराचे पडसाद गुरुवारी हिवाळी अधिवेशनात देखील उमटताना पाहायला मिळाले. एकनाथ शिंदेंनी देखील सभागृहात बोलतानाच कर्नाटक सरकारला स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. “मी स्पष्टपणे बोलू शकत नाही. पण नाक दाबलं की तोंड उघडतं असं आपण म्हणतो. असं देखील वेळ आली तर करावं लागेल आणि त्याची सर्व जबाबदारी कर्नाटक सरकारची असेल. ते सर्व आपल्याकडे आशेनं पाहात आहेत”, असं एकनाथ शिंदे म्हणाले होते. त्यानंतर आता उदय सामंत यांनी देखील महाराष्ट्र सरकारची या प्रकरणावर भूमिका स्पष्ट केली आहे.

shivraj singh chauhan Maha Vikas Aghadi and Rahul Gandhi mislead the public with false promises and no development vision
शिवराजसिंह चौहान म्हणतात राहुल गांधींकड विकासाचे कुठलेही व्हीजन नाही
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Rahul Gandhi Amravati
Rahul Gandhi: “अदानींसाठीच भाजपने आमचे सरकार पाडले”, राहुल गांधी यांचा आरोप
Bajaj auto cng bike
भविष्यात बजाजची बायोगॅसवर चालणारी दुचाकी! राजीव बजाज यांची मोठी घोषणा
Rahul gandhi
Rahul Gandhi : “आदिवासी अधिकाऱ्याला मागे बसवलं जातं अन्…”, नंदूरबारमध्ये राहुल गांधींचा मोठा दावा!
Pune Prime Minister Narendra Modi Pandit Jawaharlal Nehru Pune print news
पुणे आवडे पंतप्रधानांना!
Narendra Modi criticism of the Gandhi family solhapur news
शाही परिवारासाठी काँग्रेसकडून समाज तोडण्याचे षडयंत्र; नरेंद्र मोदी यांचा गांधी परिवारावर हल्लाबोल

“तुमचे आमदार महाराजांच्या अंगावर बूट घालून चढले होते,”; फडणवीसांनी ठाकरे सरकारला करुन दिली आठवण

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या तरुणांची भेट

“महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांनी माझी भेट घेतली. त्यांनी मागणी केली आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर निर्माण झालेल्या आक्रोशामध्ये हे तरूण होते. पण कर्नाटक सरकार त्यांच्यावर दडपशाहीने कारवाई करत आहे. ती थांबवायला हवी. त्यासाठी महाराष्ट्र सरकारने हस्तक्षेप करावा. केंद्र सरकारशी आणि कर्नाटक सरकारशी बोलावं अशी विनंती त्यांनी केली”, असं उदय सामंत म्हणाले.

“वेळ आली तर…”, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेप्रकरणी एकनाथ शिंदेंचा कर्नाटक सरकारला इशारा!

…पण मराठी बांधवांना वाऱ्यावर सोडणार नाही!

दरम्यान, यावेळी बोलताना उदय सामंत यांनी सीमाभागातील मराठी बांधवांच्या पाठिशी महाराष्ट्र सरकार ठामपणे उभं असल्याचं प्रतिपादन केलं. “आम्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू. वेळ पडली, तर कर्नाटक सरकारच्या मंत्र्यांबरोबर बोलावं लागलं, तरी त्या ठिकाणी जाऊन आम्ही चर्चा करू. पण मराठी बांधवांना वाऱ्यावर सोडणार नाही ही भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना ही निंदनीय बाब आहे. महाराष्ट्र सरकार बेळगाव, कर्नाटकमधील मराठी बांधवांच्या सोबत आहे”, असं उदय सामंत म्हणाले.