महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाच ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेचा उल्लेख करत केलेलं एक वक्तव्य सध्या जोरदार चर्चेत आहे. “सर्वांनी मदत, संपर्क आणि सेवा या तीन गोष्टी केल्या, तर मोदींना वाटतं त्याआधीच भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियनची होईल. यात माझ्यासारखा भिकारी तर काहीच करू शकत नाही,” असं वक्तव्य कोश्यारी यांनी केलं. ते गुरुवारी (२९ सप्टेंबर) नागपूरमधील सुरेश भट सभागृहात आयोजित भारत विकास परिषदेच्या संमेलनात बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भगतसिंग कोश्यारी म्हणाले, “आर्थिक दृष्टीने आपण पाचव्या क्रमांकावर आलो आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की आपली अर्थव्यवस्था लवकरच पाच ट्रिलियन डॉलरची होणार आहे. मला तर वाटतं तुम्ही सर्वांनी मदत, संपर्क आणि सेवा या तीन गोष्टी केल्या तर मोदींना वाटतं त्याआधीच भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियनची होईल. यात माझ्यासारखा भिकारी तर काहीच करू शकत नाही. हे सगळं तुम्ही सर्व लोकच करू शकता.”

व्हिडीओ पाहा :

“भारत विकास परिषदेत देशभरातील चांगले लोक आहेत. जो चांगला वकील आहे, चांगला डॉक्टर, चांगला दुकानदार असे सर्व लोक एकत्र बसतात, योजना तयार करतात. तसेच योजना करून देशभरात सेवेचं काम करतात. आपण ते काम किती पुढे नेऊ शकतो यासाठी प्रयत्न करायला हवे,” असं मत भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केलं.

“गडकरी म्हणतात की, भगतसिंग कोश्यारी तुम्ही मला आठ हजार रुपये द्या”

कोश्यारी पुढे म्हणाले, “या कार्यक्रमाला नितीन गडकरीही येत आहेत. ते मला म्हणतात की, भगतसिंग कोश्यारी तुम्ही मला आठ हजार रुपये द्या, मी आठ लाख कोटी रुपयांची कामं करेन. हाच विकास आहे. विकासाची कामं करायची असतील, तर त्यासाठी एक आपल्यात तशी इच्छाशक्ती असायला हवी.”

हेही वाचा : “तेव्हा अजित पवारांच्या मागे…”, “ती राज्यपालांची मोठी चूक…”; पहाटेच्या शपथविधीचा संदर्भ देत कायदेतज्ज्ञ उल्हास बापट स्पष्टच बोलले

“आपण जेव्हा कुटुंबाविषयी विचार करतो की, मुलाला आयएएस बनवायचं आहे, सध्या दोन कारखाने आहेत, तर १० कारखाने असावेत. जेव्हा आपण अशी इच्छा बाळगतो तेव्हा कारखानाही तयार होतो आणि मुलगा आयएएसही बनतो,” असंही कोश्यारींनी नमूद केलं.