भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची जीएसटी पथकाकडून झाडाझडती घेण्यात आली. गुरुवारी दिवसभर मुख्य कार्यालय, शेतकी-अकाउंट विभागात कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. हा कारखाना गळपाअभावी बंद आहे. कारखान्याने आर्थिक व्यवहार करताना जीएसटी थकीत ठेवल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. त्यासंबंधीची तपासणी गुरुवारी करण्यात आली असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यांसारख्या राज्यातल्या ८ ते १० कारखान्यांना केंद्र सरकार मदत करेल असं, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी सांगितलं.

भागवत कराड आज छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांना विचारण्यात आलं की, तुम्ही केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आहात, त्यामुळे तुम्ही पंकजा मुंडेंच्या कारखान्याला पुन्हा उभारणी देण्यासाठी प्रयत्न करणार आहात का? यावर भागवत कराड म्हणाले की, अशा प्रकारचे ८ ते १० कारखाने राज्यात होते. या कारखान्यांचा विषय घेऊन राज्यातलं एक शिष्टमंडळ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटलं होतं. त्यामुळे केंद्र सरकारने आता त्यांना मदत करायचं ठरवलं आहे.

Narendra Modi Kharghar, Narendra Modi latest news,
पंतप्रधानांच्या आगमनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत सरकारची स्वच्छ खारघर मोहीम सुरूच
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Sharad Pawar on Gautam Adani meeting
Sharad Pawar: “होय, बैठक झाली होती, पण…”, NCP-BJP एकत्र येण्यासाठी अदाणींच्या घरी बैठक; अजित पवारांच्या दाव्यावर शरद पवार म्हणाले…
nirmala sitharaman to meet states finance ministers for budget preparation
निर्मला सीतारामन अर्थसंकल्पाच्या तयारीला, राज्यांच्या अर्थमंत्र्यांची भेट घेणार! जीएसटी परिषदेच्या बैठकीपूर्वी मसलतही विषयपत्रिकेवर
Amit Shah IMP Statement about CM Post
Amit Shah : ‘महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण?’ अमित शाह म्हणाले, “नेतृत्व…”
Amit Shah alleges that Ajit Pawar group is occupying the sugar factories Print politics news
आजारी साखर कारखान्यांवर अजित पवार गटाचाही कब्जा; अमित शहांच्या आरोपानंतर विरोधी नेत्यांसह सत्ताधारी गटाचीही चर्चा
Amit Shah made special mention of Devendra Fadnavis in speech in shirala
अमित शहांनी फोन काढला आणि थेट फडणवीसांना लावला… म्हणाले, “पुन्हा…”

हे ही वाचा >> “सकाळी सीरियल किलर…”, संजय राऊतांच्या ‘त्या’ वक्तव्याला आशिष शेलारांचं उत्तर, म्हणाले, “देशातल्या लोकशाहीमुळेच तुम्ही…”

“आजारी साखर कारखान्यांना मदत करा”, पंकजा मुंडेंची अमित शाहांना विनंती

दरम्यान, काल टीव्ही ९ मराठीशी बोलताना पंकजा मुंडे यांनी सांगितलं की, वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना गेल्या ६ ते ७ वर्षांपासून नुकसानीत आहे. कसातरी आम्ही तो चालवत आहे. केंद्रीय मंत्री अमित शाह यांची आम्ही काही दिवसांपूर्वी यासंदर्भात भेट घेतली होती. यावेळी राज्यातल्या ४-५ काऱखान्यांचा प्रश्न मांडला होता. आम्हाला जीएसटी भरायचाय, कर्ज थकित आहे, असे काही प्रश्न त्यावेळी होते. या आजारी साखर कारखान्यांना मदत करा, अशी विनंती आम्ही केली होती.