१९२१-२०१५
ज्येष्ठ रंगकर्मी, संगीत रंगभूमीवरील अभिनेते, गायक, दिग्दर्शक नाटय़तपस्वी भालचंद्र पेंढारकर यांचे वृद्धापकाळाने मंगळवारी पहाटे मुंबईत निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पुत्र गायक-अभिनेता ज्ञानेश पेंढारकर, सून गायिका नीलाक्षी पेंढारकर, तसेच आणखी एक पुत्र व एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.
श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास होत असल्याने सोमवारी पेंढारकर यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.  पेंढारकर यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी शीव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.  त्यापूर्वी त्यांचे पार्थिव यशवंत नाटय़ मंदिर, माटुंगा येथे काही काळ अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते.
नाटय़वर्तुळात ‘अण्णा’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या भालचंद्र पेंढारकर यांनी ‘ललितकलादर्श’ नाटय़संस्थेतर्फे अनेक नाटके रंगभूमीवर सादर केली. विद्याधर गोखले लिखित ‘पंडितराज जगन्नाथ’, ‘दुरितांचे तिमिर जावो’ ही नाटके विशेष गाजली. ‘दुरितांचे तिमिर जावो’मधील पेंढारकर यांनी साकारलेली ‘दिगू’ ही व्यक्तिरेखा अजरामर झाली. याच नाटकातील ‘आई तुझी आठवण येते’ हे गाणेही खूप गाजले. पेंढारकर यांना विष्णुदास भावे पुरस्कार, संगीत नाटक कला अकादमी पुरस्कार, चतुरंग प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार, महाराष्ट्र राज्य शासनाचा प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार आदी अनेक मानसन्मान आणि पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. अत्यंत शिस्तबद्ध आणि दिलेल्या वेळेतच नाटय़प्रयोग सुरू करणारे निर्माते म्हणून त्यांची ख्याती होती. मुंबई मराठी साहित्य संघात सादर झालेल्या ३००नाटकांचे ध्वनिमुद्रण पेंढारकर यांनी केले होते. रंगभूमीच्या इतिहासात दस्तावेजीकरण ठरेल असे महत्त्वाचे काम त्यांनी यानिमित्ताने केले.

भालचंद्र पेंढारकर यांचा जीवनपट
जन्म २५ नोव्हेंबर १९२१ हैद्राबाद (दक्षिण)
संगीतातील गुरू: रामकृष्णबुवा वझे
नाट्यसृष्टीत पदार्पण १९४२
पहिली भूमिका सत्तेचे गुलाम या नाटकातील

B Praak
“…त्यामुळे माझी पत्नी आजपर्यंत माझ्यावर नाराज”, नवजात बाळाच्या मृत्यूविषयी बोलताना प्रसिद्ध गायक भावुक
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Allu Arjun
‘पुष्पा’साठी राष्ट्रीय पुरस्कार घेताना अल्लू अर्जुन दु:खी का होता? स्वत: सांगितलं कारण
Kal ho naa ho
“तिथे उपस्थित असलेल्या…”, ‘त्या’ सिनेमातील शाहरुख खानच्या मृत्यूच्या सीनबद्दल अभिनेत्रीचा मोठा खुलासा
Yoga Guru Sharath Jois
Yoga Guru Sharath Jois : मॅडोनाचे योग गुरू शरथ जोइस यांचं ट्रेकिंग करताना ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन
Tragic Video! Devotee Collapses And Dies Of Heart Attack While Circumambulating Pillar At Hyderabad Temple
बिनभरवशाचं आयुष्य! देवाच्या दारात तरुणाला मृत्यूनं कवटाळलं; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले “देवालाही दया आली नाही”
star pravah this marathi actor enters marathi serial subhavivah
‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याची एन्ट्री! पोस्ट शेअर करत सांगितलं नव्या भूमिकेचं नाव, म्हणाला…

पेंढारकरांची प्रमुख नवीन संगीत नाटके
स्वामिनी : पु.भा. भावे
दुरितांचे तिमिर जावो : बाळ कोल्हटकर
पंडितराज जगन्नाथ : विद्याधर गोखले
जय जय गौरीशंकर : विद्याधर गोखले

वेगळ्या थाटाची नाटके
आनंदी गोपाळ, रक्त नको मज प्रेम हवे, झाला अनंत हनुमंत

पेंढारकरांना मिळालेले पुरस्कार
१९६८ नागरी सत्कार
१९७३ विष्णुदास भावे पुरस्कात
१९८३ बालगंधर्व सुवर्णपदक
१९९० केशवराव भोसले पुरस्कार
१९९६ जागतिक मराठी परिषद इस्राइल
१९९९ महेंद्र पुरस्कार
२००२ अल्फा जीवन गौरव पुरस्कार
२००४ संगीत नाटक अकादमी राष्ट्रीय पारितोषिक
२००५ तन्वीर पुरस्कार
२००६ चतुरंग जीवन गौरव
२००८ महाराष्ट्र राज्य (पणशीकर) जीवन गौरव पुरस्कार

नाट्यदिग्दर्शक, नाट्यनिर्माते, ध्वनी-प्रकाश व्यवस्था, अभिनेते, गायक, संगीतकार अशा कितीतरी भूमिका भालचंद्र पेंढारकर यांनी गाजवल्या होत्या. भालचंद्र पेंढारकर यांच्या निधनाने रंगभूमीला पवित्र तीर्थ मानणारा,अतिशय शुद्धपणे मराठी रंगभूमीची सेवा करणारा ज्येष्ठ रंगकर्मी आपण गमावला आहे. त्यांच्यासम दुसरा रंगकर्मी होणे नाही. काळाच्या उदरात क्वचितच अशी माणसं घडत असतात. त्यांच्या स्मृतीस माझी विनम्र श्रद्धांजली ! –  देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री – महाराष्ट्र राज्य

भालचंद्र पेंढारकर यांच्या निधनामुळे मराठी रंगभूमीवरील एका दैदिप्यमान कालखंडावर पडदा पडला आहे. संस्था टिकली तरच नाटक टिकेल हे ब्रीद घेऊन पेंढारकर कुटुंबियांनी तीन पिढ्या योगदान दिलं. हा वारसा पिढ्यान पिढ्या कायम राहो. – अशोक हांडे (निर्माते, दिग्दर्शक)

ज्येष्ठ अभिनेते गायक भालचंद्र पेंढारकर यांचं ‘आई तुझी आठवण येते’ हे गाणं कायम माझ्या कानात गुंजत राहील. – कौशल इनामदार, संगीतकार

नाट्यक्षेत्रातील ज्येष्ठ रंगकर्मी भालचंद्र पेंढारकर यांच्या निधनाने रंगभूमीचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! – अजित पवार</span>