भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील माडगी येथील भगवान नरसिंग मंदिरांमध्ये अडकलेल्या १५ भाविकांना आज (गुरुवार) सकाळी ६ वाजता अखेर सुखरूप बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या पथकाला यश आले. यामध्ये ७ महिला व ८ पुरुष आहेत. सर्व भाविक आंधळगाव, मोहाडी, तुमसर, मुंढरी या गावातील आहेत. वैनगंगा नदीच्या पाण्याचा प्रवाह खूप जास्त असल्याने सर्वांना वरच्या माळ्यावर राहण्यास सूचना देण्यात आल्या होत्या आणि त्यांना सुरक्षित बाहेर काढण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांच्या पथकाला पाचारण करण्यात आलेले होते.
चंद्रपूर : पुरात अडकलेले २२ वाहनचालक सुखरूप; ५९१ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले
तुमसर तालुक्यातील वैनगंगा नदीपात्रात असलेल्या माडगी येथील नृसिंह मंदिरात हे १५ भाविक अडकलेले होते. यामध्ये मंदिर कमिटीचे अध्यक्ष निलकंठ पुडके, मंजुषा पुडके, पूजारी निंबार्ते, प्रशांत पटले, मोहित गायधने, रेखा हेडाऊ, रेखा निमजे, पूनम मेश्राम, सुलोचना डेकाटे, कांता सोनवाने, उमेश मेश्राम, दामोधर नंदनवार, रामेश्वर कावळे, लीलाधर ढेकळे अशा ७ महिला व ८ पुरुषांचा समावेश आहे.