गेल्या दोन दिवसांपासून लोकप्रियतेवरून शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीत कुरघोडी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसांपेक्षा जास्त लोकप्रिय आहेत, अशी जाहिरात कथित शिंदे गटाकडून दिली होती. “राष्ट्रामध्ये मोदी अन् महाराष्ट्रामध्ये शिंदे” असा मजकूरही या जाहिरातीत छापला होता. या जाहिरातीवरून शिंदे गट व भाजपामध्ये वादाची ठिणगी पडली आहे. दोन्ही पक्षातील नेत्यांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे.

भारतीय जनता पार्टीचे खासदार अनिल बोंडे यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर बोचरी टीका केली. “बेडूक कितीही फुगला तरी त्याचा हत्ती होत नाही. ठाणे म्हणजे महाराष्ट्र नाही,” अशा शब्दांत अनिल बोंडेनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्र सोडलं. बोंडे यांच्या टीकेवर शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बेडूक फुगतो की सुजतो हे नंतर कळेल, अशी प्रतिक्रिया गोगावले यांनी दिली. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

Argument between supporters of MP Namdev Kirsan and MLA Sahesram Koreti
काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीत गोंधळ; पर्यवेक्षकासमोरच खासदार-आमदार समर्थक भिडले
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
Yati Narsinghanand
प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या यती नरसिंह आनंद सरस्वतींना अखेर पोलिसांनी घेतलं ताब्यात
Devendra Fadnavis Statement about Teli Samaj Wardha
वर्धा: देवेंद्र फडणवीस म्हणतात, ’तेली समाज माझा पाठीराखा म्हणून मी पण…
Anikta Patil Resigns From BJP Before Father Harshvardhan Patil
Ankita Patil : हर्षवर्धन पाटील यांच्याआधी अंकिता पाटील यांचा भाजपाला राम राम, म्हणाल्या, “मी…”
Devendra Bhuyar and Ajit pawar
Ajit Pawar : मुलींबाबत देवेंद्र भुयारांनी केलेल्या वक्तव्यावरून अजित पवारांनी केली कानउघाडणी; म्हणाले…
What Eknath Shinde Said About Uddhav Thackeray?
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर, “माझी बाहुली हरवली, माझी सावली हरवली म्हणणाऱ्या घरबशांना..”
CM Eknath Shinde
CM Eknath Shinde : “आरोपी गोळीबार करतो, मग पोलिसांनी त्यांची बंदूक फक्त प्रदर्शनाला ठेवायची का?”, मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल

हेही वाचा- “बेडूक कितीही फुगला तरी…”, भाजपा खासदाराचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल!

अनिल बोंडेंच्या टीकेबद्दल विचारलं असता भरत गोगावले म्हणाले, “आता मगाशी माझी उपमुख्यमंत्र्यांबरोबर याबद्दल चर्चा झाली आहे. त्यांनी तिथूनच त्या लोकांना फोन करून काय सांगायचंय ते सांगितलं आहे. त्यामुळे आता आम्ही त्या खोलात जास्त शिरत नाही. वरच्या स्तरावर याचा विचार केला जाईल. बेडूक फुगतो की सुजतो हे नंतर कळेल.”

अनिल बोंडे नेमकं काय म्हणाले?

शिंदे गटाच्या जाहिरातबाजीवर प्रतिक्रिया देताना अनिल बोंडे म्हणाले, “खरं म्हणजे आपल्या विदर्भात एक म्हण आहे. बेडूक कितीही फुगला तरी त्याचा हत्ती बनत नाही. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. भारतीय जनता पार्टीसह सर्व जनतेनं त्यांना स्वीकारलं आहे. पण त्यांचे सल्लागार त्यांना चुकीचे सल्ले देत असतील, असं मला वाटतंय. कारण ठाणे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र नाहीये. उद्धव ठाकरेंना वाटत होतं की, मुंबई म्हणजे पूर्ण महाराष्ट्र आहे. आता एकनाथ शिंदेंना वाटायला लागलं की, ठाणे म्हणजे पूर्ण महाराष्ट्र आहे. पुढच्या काळात शिवसेनेला (शिंदे गट) वाटचाल करायची असेल तर भारतीय जनता पार्टीचं आणि जनतेचं मन दुखावून किंवा स्वत:ची टिमकी वाजवून कल्याण होणार नाही.”