नांदेड जिल्ह्यातील देगलुरमध्ये राहुल गांधी यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी राहुल गांधी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज की जय… ही घोषणा देऊन केली. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह प्रदेश काँग्रेसचे नेते व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

हेही वाचा – ‘भारत जोडो’ यात्रेचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वागत; १० नोव्हेंबरला नेते होणार सहभागी

Priyanka Gandhi statement regarding those who show BJP flags during road shows
रोड-शो दरम्यान भाजपचे झेंडे दाखवणाऱ्यांना प्रियंका गांधी म्हणाल्या, तुम्हाला शुभेच्छा मात्र…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Rahul Gandhi Amravati
“पंतप्रधान मोदींना स्मृतीभ्रंश झालाय, ते आजकाल…”; अमरावतीतल्या सभेतून राहुल गांधींचा हल्लाबोल!
Rahul Gandhi Amravati
Rahul Gandhi: “अदानींसाठीच भाजपने आमचे सरकार पाडले”, राहुल गांधी यांचा आरोप
Sharad Pawar Eknath shinde Ajit pawar
Sharad Pawar : अजित पवारांचा शिंदेंना दम? शरद पवारांकडून भर सभेत मिमिक्री; म्हणाले, “शिंदेंनी मला विनंती केली, समजून घ्या…”
Rahul gandhi
Rahul Gandhi : “आदिवासी अधिकाऱ्याला मागे बसवलं जातं अन्…”, नंदूरबारमध्ये राहुल गांधींचा मोठा दावा!
Amit Shah On Rahul Gandhi
Amit Shah : “इंदिरा गांधी स्वर्गातून आल्या तरी आता कलम ३७०…”, अमित शाह यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल

राहुल गांधी म्हणाले, “रात्रीच्या पावणेदहा वाजता या स्वागतासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. तेलंगणाहून आमच्यासोबत जी लोक आली आहेत आणि जी गर्दी आहे, त्यांचेही मी मनापासून आभार व्यक्त करू इच्छितो. ही यात्रा दोन महिन्यांपूर्वी आम्ही कन्याकुमारीहून सुरू केली होती आणि ही यात्रा श्रीनगर येथे जाऊन थांबणार आहे. या अगोदर या पदयात्रेस कोणतीही शक्ती थांबवू शकत नाही. काहीजरी झालं तरी ही यात्रा श्रीनगरमध्ये जसा इथे आपला तिरंगा ध्वज आहे, तिथेही तिरंगा ध्वज फडकवेल. या यात्रेचे उद्दिष्ट भारताला जोडण्याचे आहे आणि आज ज्याप्रकारे भारतामध्ये द्वेष, क्रोध आणि हिंसा पसरवली जात आहे, त्याविरोधात आवाज उठवण्याचे आहे. या पदयात्रेत जे पण आमच्याशी बोलू इच्छित आहेत, मग तो शेतकरी, मजूर, लहान व्यापारी, तरूण, वयस्कर व्यक्ती, व्यापारी किंवा कोणीही आमचे दरवाजे, आमचे हृदय त्यांच्यासाठी खुलं आहे. आमचं ध्येय भारत आणि आता पुढील पंधरा दिवस महाराष्ट्राचा आवाज, महाराष्ट्राचं सुख-दुःख ऐकायचं आहे. आमचं हेच उद्दिष्ट आहे.”

हेही वाचा – “आम्ही अल्टिमेटमला घाबरत नाही; कोणी काचा फोडल्या, दगडं फेकली असतील तर मला…”; अब्दुल सत्तारांचं विधान!

याचबरोबर “तुम्हाला माहीत आहे देशात बेरोजगारी वाढत आहे. जो रोजगाराचा कणा होता, छोटे आणि मध्यम व्यवसाय, लहान व्यापारी, शेतकरी हा कणा नरेंद्र मोदींच्या धोरणाने, नोटाबंदीने, चुकीच्या जीएसटीने तोडला आहे. आज भारताचे सत्य आहे, की देश आपल्या तरुणांना रोजगार देऊ शकत नाही. इच्छा असली तरी रोजगार देऊ शकत नाही. एकीकडे बेरोजगारी, तर दुसऱ्या बाजूला महागाई आहे. तुम्हाला आठत असेल भारताचे पंतप्रधान काही काळ अगोदर तक्रार करत होते, गॅस सिलिंडर ४०० रुपयांचा झाला. आज त्याची किंमती किती झाली आहे? आजच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीबाबत पंतप्रधान काहीच बोलत नाहीत. अगोदर पंतप्रधान डिझेल-पेट्रोलबाबत बोलत होते, आज १०० रुपयांच्या पुढे पेट्रोलचे दर आहेत. मात्र पंतप्रधान काहीच म्हणत नाहीत. केवळ निवडक लोकांना, दोघा-तिघांना संपूर्ण फायदा सरकार पोहचवत आहे. या मुद्य्यांसाठी आम्ही उभा आहोत, आम्ही चालतो आहोत दिवसभर चालतो आहोत आणि तुमचं म्हणणं ऐकत आहोत. सहा-सात तास ऐकल्यानंतर जे शेतकऱ्यांच्या मनात आहे, मजुरांच्या मनात आहे ते ऐकल्यानंतर यात्रेच्या शेवटी सांयकाळी आम्ही १५ मिनिटे, जास्तीत जास्त २० मिनिटे आमचं म्हणणं मांडतो. हेच आम्ही महाराष्ट्रात करणार आहोत.” असंही राहुल गांधींनी सांगितलं.

हेही वाचा -“सत्ता गेल्यानंतर यांना बांध कळू लागला; काही लोक केवळ फोटो काढण्यासाठीच…”- अब्दुल सत्तारांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा!

याशिवाय, “मला खूप आनंद होत आहे की आज मी छत्रपती शिवाजी महाराजांच्यासमोर उभा राहून ही सुरुवात करत आहे. हा तुमचा इतिहास आहे आणि खूप आवश्यक प्रतिक आहे. मला खूप आनंद होत आहे की आज इथून आम्ही आज सुरुवात करत आहोत. रात्रीची वेळ असल्याने मी फार काही बोलणार नाही. मी पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद म्हणू इच्छितो.” असं म्हणत राहुल गांधी यांनी भाषण संपवलं.