बीड : भारत राष्ट्र समिती पक्ष मोठय़ा ताकदीने पुढे येत आहे. अनेक नवीन चेहरे पक्षात दाखल होत असून, पंकजा मुंडे यांच्यासारख्या सक्षम नेतृत्वाने प्रवेश केल्यास मुख्यमंत्री चंद्रशेखर राव नक्कीच त्यांना न्याय देतील, असे स्पष्ट करत भारत राष्ट्र समितीचे बाळासाहेब सानप यांनी पंकजा मुंडेंना मुख्यमंत्रिपदासह साद घातली आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंकजा कोठेही जाणार नाहीत, त्यांच्या रक्तात भाजप आहे, असे स्पष्ट केले.  बीडमध्ये भारत राष्ट्र समितीचे समन्वयक बाळासाहेब सानप माध्यमांशी बोलताना म्हणाले, की पंकजा मुंडे सक्षम नेतृत्व आहे. या नेतृत्वाला राष्ट्रीय अध्यक्ष तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव ताकद देतील. पंकजा मुंडे पक्षात आल्या, तर त्यांचे स्वागतच करू. दरम्यान, पंकजा मुंडे गेल्या काही दिवसांपासून भाजपत नाराज आहेत. परळीतील गोपीनाथगडावरून त्यांनी ही नाराजी जाहीरपणे बोलून दाखविली होती. त्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंना राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि एमआयएमनेही पक्ष प्रवेशाचे आमंत्रण दिले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bharat rashtra samithi offer chief minister post to pankaja munde zws
Show comments