‘शिवसेने’चं नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे पक्ष चिन्ह गोठण्याचा हंगामी निर्णय निवडणूक आयोगाने शनिवार ( ८ ऑक्टोंबर ) घेतला. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर नव्यानं उभारी घेत असलेला शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जातो. यावरून राज्यातील राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. याप्रकरणावर शिवसेना नेते भास्कर जाधव यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रसारमाध्यमांशी बोलताना भास्कर जाधव म्हणाले, “निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाणा’बाबत दिलेला निर्णय सर्वांना धक्का देणारा आहे. या निर्णयातून सध्याच्या लोकशाहीचं भवितव्य काय हा प्रश्न निर्माण होतो. देशाची संसदीय लोकशाही प्रणाली राहणार की? हुकूमशाही, एकाधिकारशाही येणार. इंदिरा गांधी यांनी हिंमतीने तेव्हा आणीबाणी जाहीर केली होती. मात्र, सध्या देशात अघोषित आणीबाणी सुरु आहे,” अशी टीका त्यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर केली.

हेही वाचा – उद्धव ठाकरेंना दिलासा! “शिवसेना नाव वापरता येणार पण…,” ‘या’ नेत्याने स्पष्टचं सांगितलं

“मी माझ्या व्यथा मांडू कुठे”

पुढे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांंची कविता म्हणून दाखवत भास्कर जाधवांनी म्हटलं, “ही न्यायव्यवस्था रखेल झाली, संसद देखील षंढाची हवेली झाली, मी माझ्या व्यथा मांडू कुठे. येथील न्यायव्यवस्था भ्रष्टतेने रंगीण झाली,” अशा शब्दांत भास्कर जाधव यांनी हल्लाबोल केला आहे.