भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रेशखर बावनकुळे यांनी शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंना यापुढे ‘घरकोंबडा’ म्हणाव लागेल. कारण, ठाकरेंनी आता राजकारणाची सर्व पातळी सोडली आहे, असं बावनकुळे यांनी म्हटलं. याला आमदार भास्कर जाधव यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. वेस्ट इंडिजच्या खेळाडूने आपल्या तोंडावर लगाम लावावा, असा इशारा भास्कर जाधव यांनी दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भास्कर जाधव म्हणाले, “चंद्रशेखर बावनकुळे उद्धव ठाकरेंवर खालच्या पातळीवर टीका करतात. कधी घरकोंबडा तर आणखी काही म्हणतात. मी गेल्यावेळी बावनकुळेंना वेस्ट इंडिजचा खेळाडू बोलल्यावर व्यक्तीगत टीका केली म्हणाले. मग, उद्धव ठाकरेंना घरकोंबडा म्हणता, ही व्यक्तीगत टीका नाही का?”

हेही वाचा : आमदार अपात्रतेबाबत ‘या’ तारखेला प्रत्यक्ष सुनावणी; ठाकरे गट आरोप करत म्हणाला…

“वेस्ट इंडिजच्या माणसाला ठाकरे घराण्याची महती काय कळणार? तुम्हाला आणि फडणवीसांना काही बोलायचं नाही. आमच्या पक्षप्रमुखांवर तुम्ही वाटेल ते बोलणार का? हे चालणार नाही. वेस्ट इंडिजच्या खेळाडूने आपल्या तोंडाला लगाम लावावा,” असा शब्दांत भास्कर जाधव यांनी बावनकुळे यांना सुनावलं आहे.

हेही वाचा : “भाजपाला गाफील ठेवून शरद पवार यांनी घात केला”, मंत्र्याचा थेट हल्लाबोल

बावनकुळे काय म्हणाले?

चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘एक्स’ ( ट्वीटर ) अकाउंटवर म्हटलं की, “उद्धव ठाकरेंना यापुढे जाहीरसभेतून ‘घरकोंबडा’ म्हणावं लागेल. कारण त्यांनी आता राजकारणाची सर्व पातळी सोडली आहे. खरे तर सत्तेसाठी तुम्ही ‘हपापले होते आणि आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीसांवर वैयक्तिक टीका भाजपा सहन करणार नाही.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhaskar jadhav attacks chandrashekhar bawankule said west indies player over uddhav thackeray comment ssa