शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची खेड येथील गोळीबार मैदानात सभा पार पडत आहे. या सभेत बोलताना आमदार भास्कर जाधव यांनी माजी मंत्री रामदास कदम यांचा समाचार घेत, शिंदे सरकारवर घणाघात केला. विधानसभेत मला चारही बाजूनं घेरण्याचं काम सुरु आहे. मला बोलू दिलं जात नाही. पण, माझा आवाज बंद करण्याची तुमच्या बापाची हिंमत नाही, असा हल्लाबोल भास्कर जाधव यांनी केला आहे.
भास्कर जाधव म्हणाले, “तुम्ही जनतेचे सरकार म्हणता, ‘सबका साथ, सबका विकास’च्या घोषणा देतात. मात्र, उद्धव ठाकरेंच्या सरकारने दिलेले पैसे तुम्ही रोखलं. हेच का तुमचं ‘सबका साथ सबका विकास.’ बोलायचं फक्त, पण तसं करायचं नाही.”
“रामदास कदम हे झपाटलेल्या चित्रपटातील तात्या विंचू आहेत. रोज सगळ्या गावात फिरतात आणि सांगतात, उद्धव ठाकरेंनी मला संपवलं. खरे तर उद्धव ठाकरेंनी यांच्यासारखी बांडगुळं का बाळगली होती, काय माहिती. आदित्य ठाकरेंनी माझ्याबाजूला बसून रोज कामं करुन घेतली. परंतु, ह्यांना साध पर्यावरण म्हणतात येत का?,” असा सवाल भास्कर जाधव यांनी रामदास कदमांना विचारला आहे.
“करोनाच्या संकटात रामदास कदम कधी मतदारसंघात फिरले का? एकाही गावात हे गेले नाहीत. गेली ५ वर्षे मंत्री होते. मतदारसंघात एक रुपयांचं काम केलं नाही. आपला मुलगा दापोलीतून निवडून आणण्यासाठी राज्याच्या तिजोरीतून जे काही पैसे आणले ते मतदारसंघात दिले,” असा आरोप भास्कर जाधव यांनी केला.
हेही वाचा : भविष्यात वंचित-मविआची युती होणार?; शरद पवारांचं थेट विधान, म्हणाले…
“रामदास कदमांना मातील घालायचं असेल, तर संजय कदमांना येथे आणावं लागेल. याबद्दल आमचं एकमतं झालं आहे. अनेकांवर केसेसे झाल्या, जप्ती करण्यात आली, माझं घर जाळण्याचं काम केलं. मात्र, रामदास कदमांसारख्या भंपक माणसाला पुरून उरल्याशिवाय राहणार नाही,” असं भास्कर जाधवांनी सांगितलं. आहे.