ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे महाप्रबोधन यात्रेत प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप करत शिवसेना नेते विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव आणि सुषमा अंधारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईनंतर उद्धव ठाकरे गटातील नेत्यांकडून सत्ताधाऱ्यांवर गंभीर टीका केली जात आहे. आमदार भास्कर जाधव यांनीही गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही केलेल्या भाषणात कोणते चिथावणीखोर वक्तव्य होते, याचा तपास केल्याशिवाय गुन्हा दाखल करता येत नाही. मात्र गुन्हा दाखल झाला असेल तर आम्ही त्याला कायदेशीर उत्तर देऊ, असे भास्कर जाधव म्हणाले आहेत. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.

हेही वाचा >>> समता पार्टीच्या ‘मशाल’ चिन्हावरील दाव्यानंतर उद्धव ठाकरे गटाची भूमिका काय? भास्कर जाधव म्हणाले “हे चिन्ह आम्ही…”

Jayashree Thorat
Jayashree Thorat : “महिलांचा अपमान करणारे मोकाट अन् पोलिसांनी आमच्यावरच गुन्हे दाखल केले”; जयश्री थोरातांची व्यथा
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
Action taken against constable who asked for bribe to help accused
आरोपीला मदत करण्यासाठी लाच मागणाऱ्या हवालदारावर कारवाई
kalyan de addiction centre staffers arrested for assaulting patients
दारू सोडविण्यासाठी आलेल्या रुग्णांना मारहाण; कल्याणमधील अनधिकृत नशामुक्ती केंद्राचा अमानुष कारभार
BJP MLA Rajesh Chaudhary Family Members Created Ruckus in Hospital
VIDEO : भाजपा आमदाराचा भाऊ-पुतण्याची गुंडगिरी, रुग्णालयाची तोडफोड; डॉक्टर व नर्सना लाथाबुक्क्यांनी मारहाण
Sanjay Raut and Nana Patole
Mahavikas Aghadi : नाना पटोले अन् संजय राऊतांमधील वाद मिटला? बैठकीनंतर एकत्र येत भाजपावर केला गंभीर आरोप; म्हणाले, ‘मोठं षडयंत्र…’
Police officer suspended for not responding to register molestation case
लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ; पोलीस अधिकाऱ्याचे निलंबन
Salman Khan News 25 Lakh Contract to Hit Him AK 47 From Pak Said Police Chargesheet
Salman Khan : “सलमान खानला मारण्यासाठी २५ लाखांची सुपारी आणि…”, बिश्नोई गँगचा कट काय होता?

शिवसेनेचे काम करायचे म्हणजे निखाऱ्यावरून चालावे लागते, हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळे निखाऱ्यावरून चालत असताना चटके बसणारच आहेत. आम्हाला फार काही चिंता नाही. तेव्हा जे भाषण झाले, त्यामध्ये काय चिथावणीखोरपणा आहे, याचा तपास केल्याशिवाय गुन्हा दाखल करता येत नाही. तरीदेखील त्यांनी असा काही गुन्हा दाखल केला असेल, तर आम्ही त्याला कायद्याने उत्तर देऊ. आता महाराष्ट्रात गद्दारीच्या विरोधात जो राग निर्माण झाला आहे. जो आगडोंब उसळला आहे, तो अशा प्रकारचे गुन्हे दाखल करून थांबणार नाही, असे भास्कर जाधव म्हणाले.

हेही वाचा >>> “आमची मशाल ४० मुंडक्यांच्या रावणाला…”; मनिषा कायंदेंची शिंदे गटावर जोरदार टीका

आमच्यातील काही ठराविक लोकांवर गुन्हे दाखल करून हा वणवा विझणार नाही. हा विचारांचा वणवा दिवसागणिक वाढत जाईल. त्यामुळे असे गुन्हे दाखल करताना त्यांनी काही विचार करणे गरजेचे आहे. आज त्यांच्या बाजूला असलेले लोक उद्धव ठाकरे यांच्याविरोधात काही-बाही बोलत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात समन्यायी प्रमाणात न्याय दिला पाहिजे, अशी मागणीही भास्कर जाधव यांनी केली.