Bhaskar Jadhav Reaction Barsu Refinery Project : रत्नागिरीतील राजापूर तालुक्यात बारसू गावात रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी माती परीक्षण सुरू झाले असून याला ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला आहे. तसंच, जनमत लक्षात घेता ठाकरे गटाच्या शिवेसनेनेही या प्रकल्पाला विरोध दर्शवला आहे. त्यापार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज बारसू दौऱ्यावर आहेत. मात्र, त्यांना येथे सभा घेण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गुहागर मतदारसंघाचे आमदार भास्कर जाधव यांनी सरकारला सवाल विचारला आहे. गेल्या काही दिवसांत या प्रकरणी त्यांची प्रतिक्रिया आली नव्हती. त्यांनी आज राजापुरात सोलगाव येथे माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“मी इथला स्थानिक लोकप्रतिनिधी नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे येत आहेत, मी बोलण्यापेक्षा ते बोलतील. आम्ही बोलण्यापेक्षा ते बोलणं अतिशय महत्त्वाचं आहे. जर सरकारला खरोखर रोजगार द्यायचा असेल तर ३-४ लाख कोटी खर्च कोण करणार आहे? हे सांगाव. १ लाख लोकांना रोजगार देणार आहात, असा कोणता प्रकल्प जो १ लाख रोजगार देईल?” असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

“याकरता एक मंडप लावा, एका मंडपात सरकारतर्फे किंवा भाजपाच्या नेतेमंडळींनी यावं, त्याच स्टेजवर मी येईन. आणि जनतेचे समाधान करा. हा केवळ लोकांना उल्लू बनवण्याचा प्रयत्न आहे. आमचा एअरबस, फॉक्सकॉन प्रकल्प घेऊन या आणि हा प्रकल्प गुजरातला न्या”, असंही भास्कर जाधव म्हणाले.

हेही वाचा >> शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आज महाडमध्ये शक्तिप्रदर्शन; स्नेहल जगताप यांचा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश

रत्नागिरीतील सभेला उद्धव ठाकरेंना परवानगी नाकारण्यात आली आहे. यावरूनही भास्कर जाधवांनी सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की,”सत्तेचा दुरुपयोग करताहेत हे स्पष्ट दिसतंय. सभेला परवानगी दिली नाही म्हणून लोकांच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत असं नाही.”

पोलिसांवरही टीका

“पोलिसांना जे आदेश आहेत त्या पद्धतीने वागतात. पोलिसांना प्रत्येक क्षेत्रात अमर्याद अधिकार दिलेले आहेत. ते बोलतील तो नियम. त्यांच्या अंगावर वर्दी चढली की त्यांना नशा चढते”, असंही भास्कर जाधव म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhaskar jadhav finally spoke on barsu refinery project said 1 lakh direct jobs sgk