संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. कसब्यात काँग्रेसचे अधिकृत उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा विजय झाला आहे. त्यांनी भाजपाचे उमेदवार हेमंत रासने यांचा ११ हजार ४० मतांनी पराभव केला आहे. तब्बल ३० वर्षांनी काँग्रेसने भाजपाच्या बालेकिल्ल्याला सरुंग लावला आहे. यानंतर आता शिवसेना ( ठाकरे गट ) भास्कर जाधव यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे.

रवींद्र धंगेकरांचं अभिनंदन करत भास्कर जाधव यांनी मतदार आणि कार्यकर्त्यांचं धन्यवाद मानलं आहेत. “भाजपाला वाटतं होतं. कसब्यात आम्हाला कोणीही हरवू शकत नाही. पण, भाजपाचे जुने कार्यकर्ते, पदाधिकारी, हिंतचिंतक ज्यांनी ५० वर्षे सातत्याने एक ना एक दिवस आमचा उजडेल याची वाट बघितली. त्यामुळे त्यांनी तत्व, सिद्धांत आणि निष्ठा आणि ध्येयाची लढाई लढली.”

अग्रलेख : आहे बहुमत म्हणून…?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
controversial statements by bjp union minister
भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या विधानांमुळे वाद; विरोधकांच्या टीकेनंतर सुरेश गोपी यांची सारवासारव
Shivsena MLA Arjun Khotkar
Arjun Khotkar : “राजकीय भूकंप काय असतो हे आम्ही दाखवून देऊ”, अर्जुन खोतकरांचं मोठं विधान; कोणाला दिला इशारा?
Ajit Pawar On Jitendra Awhad
Ajit Pawar : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीबद्दल जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांच्या तपासात…”
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray :
Sanjay Shirsat : “महिन्याभरात राजकारणाला मोठी कलाटणी मिळेल”, संजय शिरसाटांच्या दाव्याने ठाकरे गटात खळबळ; म्हणाले, “सर्व खासदार…”
girish mahajan chhagan bhujbal l
छगन भुजबळ भाजपात प्रवेश करणार? गिरीश महाजन म्हणाले…
Sanjay Shirsat On Uddhav Thackeray
Sanjay Shirsat : “उद्धव ठाकरेंच्या हदबलतेला फक्त संजय राऊत जबाबदार”, संजय शिरसाट यांचा हल्लाबोल

हेही वाचा : देवेंद्र फडणवीसांचा नाना पटोलेंना टोला; म्हणाले, “नानाभाऊ, आता तुमच्यावर ही वेळ आलीये की…”!

“भाजपाला देशात आणि राज्यात दिसणार यश हे विरोधी पक्षातील मोठे नेते आपल्या पक्षात घेतलं म्हणून दिसत आहे. त्यानंतर भाजपाच्या नेतृत्वाच्या डोक्यात हवा गेली. त्यातून भाजपाच्या मूळ विचारधारेचा कार्यकर्ता दुखावला गेला. त्याने कसब्याची जागा ही काँग्रेसने जिंकून आणली. त्यामुळे भाजपाच्या अहंकारी नेत्यांच्या डोळ्यात त्यांच्याच लोकांनी झणझणीत अंजन घातलं आहे,” असेही भास्कर जाधव यांनी सांगितलं.

हेही वाचा : रवींद्र धंगेकरांच्या विजयानंतर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कसब्यातील परीवर्तन…”

“भाजपा आणि शिंदे गटातील सर्व मंत्री कसब्यात बसले होते. सगळी शक्ती, युक्ती, सत्ता, मस्ती, सत्तेचा मलिदा त्याठिकाणी प्रचंड प्रमाणात वाटला गेला. परंतु, धनशक्तीपेक्षा जनशक्ती मोठी आहे,” असा टोला भास्कर जाधव यांनी भाजपाला लगावला आहे.

Story img Loader